बिजींग : वृत्तसंस्था
चीन अमेरिकेतील पेंटागॉनपेक्षा १० पट मोठी मिलिट्री सिटी बनवत आहे. बीजिंगच्या या मिलिटरी सिटीमध्ये तयार करण्यात येत असलेले बंकर अणुहल्ल्यालाही तोंड देण्यास सक्षम असणार आहेत. हे बंकर युद्धादरम्यान कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणूनही काम करू शकतात. आतापर्यंत पेंटागॉन ही जगातील सर्वात मोठी संरक्षण मंत्रालयाकडून चालवण्यात येणारी अधिकृत इमारत आहे. आता चीन त्यापेक्षा दहा पट मोठी सिटी तयार करत आहे. लष्करी तज्ज्ञ याला तिस-या महायुद्धाची तयारी असल्याचे सांगत आहेत.
मिलिट्री सिटी बीजिंग शहरापासून ३२ किलोमीटर दक्षिण-पश्चिममध्ये असणार आहे. त्याचे क्षेत्रफळ चार किलोमीटर असणार आहे. त्यात बंकरसुद्धा असणार आहेत. हे बंकर अण्वस्त्र हल्लांना तोंड देण्यास सक्षम असणार आहे. सन २०२२ मध्ये हा परिसर एक मैदान होता. सन २०२४ च्या मध्यापर्यंत संपूर्ण परिसर स्वच्छ करुन रस्ते आणि बोगद्यांचे नेटवर्क तयार करण्यात आले.
मिलिट्री सिटी परिसरात ड्रोन उडवण्यास प्रतिबंध आहे. जवळ असणारे हायकिंग ट्रेल्स बंद करण्यात आले आहे. या भागात कॅमेरे किंवा इतर कोणत्याही प्रकारची टेहाळणी करण्यास बंदी घातली आहे. चीनने ही योजना पूर्णपणे गुप्त ठेवली आहे. या भागात चीन सैनिक दिसत नाहीत. परंतु अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार, या ठिकाणी चीनचे कमांड सेंटर तयार होत आहे. शी जिनपिंग वेगाने आपले अण्वस्त्र भंडारही वाढत आहेत. यामुळे नजीकच्या काळात अमेरिकेतील अण्वस्त्रांपेक्षा जास्त अण्वस्त्रे चीनकडे असण्याची शक्यता आहे.