चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन

लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना, लि., वैशालीनगर, निवळी ता.  लातूर येथील कारखान्यात गळीत हंगाम वेळेवर आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे केली जात आहेत. याच तयारीचा एक भाग म्हणून मंगळवार दि. २१ जुलै रोजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख आणि संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आला. या पूजनानंतर संचालकांच्या उपस्थितीत गळीत हंगाम तयारीबाबत आढावा बैठकही संपन्न झाली.
विलास कारखाना कार्यक्षेत्रात गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी कारखान्याचे संस्थापक चेअरमन, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख आणि चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने सर्व हंगामपूर्व यंत्रसामुग्री देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून, मागील गळीत हंगामाप्रमाणेच येणारा हंगाम २०२६-२७ यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध आहे. कारखान्याकडे सभासदांच्या १४७१९.७८ हेक्टर तर बिगर सभासदांच्या ६११३.०९ हेक्टर, अशी एकूण २१०३२.८७ हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. विलास साखर कारखान्याने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले असून, या हंगामात जास्तीत जास्त ऊस हा तोडणीयंत्राद्वारे तोडणी करण्यात येणार आहे. भविष्यात ऊसाची उपलब्धता पाहता, १०० टक्के ऊस तोडणी यंत्राद्वारे केल्यानंतर ऊसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी बसविण्यात येत आहे.या हंगामात तांत्रिक कारणांमुळे कारखाना बंद तास कमी राहतील याची दक्षता घेतली जाणार आहे. हंगाम बंद असताना सुरू असलेली मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून, लवकरच कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज असेल अशी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला विलास सहकारी साखर कारखाना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनानुसार, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख आणि कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत आहे. विलास सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात ऊस उत्पादकांना प्रति मे. टन रुपये ३१७१ इतका उच्चांकी दर दिला आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद आणि ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये मोठे आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. या विक्रमी दरामुळे शेतक-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत झाली असून, कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
मील रोलर पूजन कार्यक्रमास माजी आमदार तथा व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, संचालक रवींद्र काळे, अमृत जाधव, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, गोवर्धन मोरे, रंजीत पाटील,रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, दीपक बनसोडे,  लताबाई देशमुख, सुभाष माने, ऊस उत्पादक सभासद रमेश देशमुख व खातेप्रमुख, विभाग प्रमुख तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news