23 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeसोलापूरछत्रपती संभाजी महाराज तलावातील जलपर्णीमुळे नगरवासीय त्रस्त

छत्रपती संभाजी महाराज तलावातील जलपर्णीमुळे नगरवासीय त्रस्त

सोलापूर : विजापूर रोड येथील छत्रपती संभाजी महाराज तलावात जलपर्णी वाढली आहे. काही दिवसांपासून जलपर्णी काढण्यास सुरुवात झाली. मात्र, तलावाच्या पोस्टल कॉलनी व माजी सैनिक नगर येथील जलपर्णी तशीच आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज तलाव स्वच्छ करण्यास सुरुवात झाली. या काळात तलाव पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. माजी सैनिक नगर परिसरातील तलावामधील जलपर्णीदेखील काढण्यात आली, तर पोस्टल कॉलनीकडील तलावातील जलपर्णी तुलनेने कमी होत्या. मात्र, गणेश विसर्जन झाल्यानंतर पुन्हा जलपर्णीच्या वाढीस सुरुवात झाली.

सध्या पोस्टल कॉलनी व माजी सैनिक नगर येथील तलावात जलपर्णी पूर्णपणे पसरल्या आहेत. मात्र, फक्त मुख्य तलावातील जलपर्णी काढण्यात येत आहे. उर्वरित दोन्ही बाजूंकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. तलावाचा पोस्टल कॉलनीकडील भाग मागील वर्षी महापालिकेकडून तलाव स्वच्छ करण्यात आला होता. यावेळी मात्र स्वच्छता झाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR