चाकूर : प्रतिनिधी
शासनाच्या वतीने जनगणना सुरू झाली असून या जनगणनेत भाटसांगवी गावासह तालुक्यातील सर्व गावातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून घराची जनगणना करून घ्यावी, असे आवाहन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
तालुक्यातील भाटसांगवी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ३७ लाख रुपयाच्या ग्रामपंचायत इमारतीचा व २० लाख रुपयाच्या सभागृहाचे लोकार्पण ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भागवतराव टमके होते तर मंचावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, उषाताई कांबळे, उपसभापती भुजंग शिंदे, सरपंच जयश्रीताई कवठे, मच्छींद्र नागरगोजे, पद्माकर पाटील, बालाजी सूर्यवंशी, यशवंत जाधव, अनिल वाडकर, नंदकुमार पवार, संतोष कलवले, मधुकर मुंडे, सिद्धेश्वर अंकलकोटे,निलेश भंडे, अब्दुल शेख, दयानंद साठे, बळीराम भोसले, परमेश्वर नवगन, संदीप शेटे, धनराज बाचीफळे, केशव सांगवे, देवानंद पाटील, संजय कुंभार ,संग्राम पटणे, तुकाराम साठे ,उद्धव बिराजदार, सचिन तोरे हे उपस्थित होते.
सहकार मंत्रीबाबासाहेब पाटील म्हणाले की, भाटसांगवीची ग्रामपंचायत इमारत ही अत्यंत खूप चांगली झाली असून, या इमारतीतून लोकांचे प्रश्न आपण सोडवले पाहिजेत. शाळा ,सोसायटी आणि ग्रामपंचायतीचा विकास म्हणजेच ख-या अर्थाने गावाचा विकास असून भाटसांगवीच्या विकासासाठी मी कायम प्रयत्नशील असून आता माझ्यासोबत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य या गावच्या विकासासाठी कटिबद्ध असतील अशी ग्वाही सहकारमंत्र्यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष गणपत कवठे यांनी सादर केले. यात त्यांनी ग्रामपंचायतीच्या इमारतीविषयी व विविध विकास कामाविषयी त्यांनी आढावा सादर केला.
यावेळी दयानंद सुरवसे, मच्छींद्र नागरगोजे, उषाताई कांबळे, मिलिंद महालिंगे यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिलाल पठाण यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष गणपत कवठे यांच्यासह अंकुश टमके, गोविंद टमके, हरिभाऊ टमके, अंतेश्वर टमके व गावातील इतर पदाधिका-यांनी यांनी परिश्रम घेतले.

