लातूर : प्रतिनिधी
नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी आपल्या मतदारसंघात जाऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घ्याव्यात. कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घेऊन सामान्य माणसाची अडलेली कामे मार्गी लावावी आणि लोकांशी कायम नाळ जोडावी, असे मोलाचे मार्गदर्शन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची भाग्यवाहिनी असलेल्या विलास सहकारी साखर कारखान्यात दि. २० फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साही वातावरणात ११ लाख ११ हजार १११ साखर पोती पूजनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचे औचित्य साधून यावेळी लातूर आणि रेणापूर तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस अशोक मुकूंदराव काळे, माजी चेअरमन धनंजय देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, ट्वेंन्टी वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, रेणा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रविण पाटील, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील व कार्यकारी संचालक युनिट-२ ए. आर. पवार, तसेच कारखान्याचे संचालक रविंद्र काळे, अमृत जाधव, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, नितीन पाटील, गोवर्धन मोरे, रंजीत पाटील, रसुल पटेल, तात्यासाहेब पालकर, हणमंत पवार, नेताजी साळुंके (देशमुख), रामराव साळुंके, दिपक बनसोडे, लताबाई देशमुख, शाम बरुरे, सुभाष माने, आबासाहेब पाटील व रमेश देशमुख आदी उपस्थितीत होते.
यावेळी पूढे बोलतांना आपण केलेले कार्य कधीही पुसले जात नाही. लोकनेते विलासराव देशमुख साहेब व बब्रुवानजी काळे यांनी ४० वर्षापूर्वी मांजरा कारखाना उभारणीसाठी लागणारे शेअर्स खरेदी करावे म्हणून नागरीकांना आवाहन करीत होते, पण तेवढे पैसे गुंतवण्याची क्षमता शेतक-यांकडे नव्हती. यानंतर सर्वामध्ये विश्वास संपादन करून कारखाने उभारले, हे काम पुसले जाणार नाही. याची माहिती तरूण पिढीला सतत दिली पाहिजे. शेजारचे जिल्हे पाहता त्यांच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात मांजरा परिवारातील कारखान्यांनी खूप चांगले काम केले आहे, असे सांगून श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या की, जिथे आपण काम करतो, त्या संस्थेवर कर्मचा-यांनी निष्ठा ठेऊन काम केल्यास आपल्या मेहनतीला यश येते असे त्या म्हणाल्या.
मांजरा परिवारातील साखर कारखान्यांचे नाव सर्वत्र सन्मानाने घेतले जाते. लोकनेते विलासराव देशमुख यांनी लावलेला वटवृक्ष मोठा झाला आहे. ज्या दूरदृष्टीने साखर कारखाने उभारले. त्यासाठी पाण्याचे स्त्रोतही उभारले ते लोकनेते विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळेच, आजही त्यांनी उभारलेल्या बॅरेजेसमुळे शेतक-यांच्या शेतीला मुबलक पाणी मिळत आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेस आघाडी उमेदवारांना विश्वासाने निवडूण दिले आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे काम नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी करावे, असे आवाहन खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी माजी आमदार तथा कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे म्हणाले की, १९९५ साली अतिरिक्त उसाचा प्रश्न उद्भवल्याने ही बाब लोकनेते विलासराव देशमुख यांना सांगितली. त्यावेळी त्यांच्या दूरदृष्टीमुळेच हा कारखाना उभारला गेला. तसेच नवनिर्वाचित जि. प. व पं. स. सदस्यांनी आपआपले मतदारसंघ संभाळले पाहिजेत. सदस्यांनी विकासाचा आराखडा तयार करून विकासाची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविली पाहिजेत. आपल्याकडे आलेला माणूस निराश होऊन गेला नाही पाहिजे. तरच आपण चांगले काम करू, ग्रामीण भागातील माणसांना आपलेपणा वाटला पाहिजे अशा प्रकारचे काम करावे असे सांगीतले.
यावेळी जि. प. सदस्या सोनाली थोरमोटे पाटील म्हणाल्या की, गेल्या ५ वर्षापूर्वी पक्षाने काम करण्याची संधी दिली होती. तसेच प्रत्येक कार्यकर्त्यामुळे व साहेबांच्या विश्वासामुळे आमच्यात जिंकण्याची ताकद निर्माण झाली. हूकूमशाहीच्या विरोधात लढा दिला. साहेबांच्यावर प्रेम करणा-यांनी आम्हाला निवडूण दिले. सभागृहात अन्याया विरोधात लढा देऊन सर्व सामान्यांपर्यंत विकासाची गंगा पोहचविण्याचे काम करू. प्रास्ताविक
कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले. सुत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले. तर आभार संचालक तात्यासाहेब पालकर यांनी मानले. याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि काँग्रेस आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित असलेले लातूरचे खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांचा सत्कार व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचा सत्कार संचालक रविंद्र काळे यांनी केला. विशेष म्हणजे सर्व मान्यवरांचा सत्कार शाल, पुस्तक आणि फळझाडाचे रोप देऊन करण्यात आला. या माध्यमातून सामाजिक आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवलेल्या लातूर तालुका आणि रेणापूर तालुक्यातील काँग्रेस आघाडीच्या सदस्यांचा कारखान्याच्या वतीने भव्य सन्मान करण्यात आला.
यामध्ये जिल्हा परिषद सदस्या सौ. राजश्री देशमुख, महादेव मस्के, सौ. सोनाली थोरमोटे, सौ. भागीरथी पाटील, सौ. अश्विनी शिंदे, श्रीकांत (बाळू) माने, सौ. दिपाली आदमाने, दत्तात्रय टेकाळे, सौ. आशा भिसे आणि सौ. मनिषा कदम तर पंचायत समिती सदस्य सौ. तनुजा चव्हाण, सौ. प्रिया उफाडे, सौ. पूजा जाधव, सौ. शिवानी शिंदे, अक्षय देशमुख, सत्यनारायण पाटील, उध्दव जाधव, तात्याराव वाघमारे, बालाजी गोटके, विलास ऊफाडे, बाळासाहेब कदम, दिपाली कराड, शरयू गायकवाड, महेश चव्हाण, अमोल देडे, सुनंदा स्वामी, पूजा ढगे, गुरूनाथ गवळी आदी सदस्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

