लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या लोककल्याणकारी कार्याची माहिती आणि विचारांचा संपूर्ण देशभरात प्रसार करण्यासाठी दिल्ली येथील जनार्दन पाटील यांनी आग्रा ते बाभळगाव (ता. लातूर) अशी विशेष कार यात्रा काढली.
शनिवारी ही यात्रा लातूरमध्ये पोहोचली. रविवारी सकाळी जनार्दन पाटील यांनी बाभळगाव येथील लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी बाभळगाव निवासस्थानी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेतली. यावेळी त्यांचा त्यांनी यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी बाभळगावचे माजी उपसरपंच गोविंद देशमुख उपस्थित होते.
















