जन धन योजनेतील दर चौथे खाते अकार्यक्षम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जन धन योजनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील दर चार जन धन खात्यांपैकी एक खाते सध्या अकार्यक्षम झाले आहे. तसेच तब्बल ५.७२ कोटी खात्यांमध्ये एक रुपयाही शिल्लक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत देशभरात एकूण ५९ कोटी ३ लाख ७४ हजार ९०७ जन धन खाती उघडण्यात आली आहेत. या सर्व खात्यांमध्ये मिळून एकूण ३,१५,१७९.९० कोटी रुपयांची रक्कम जमा आहे. विशेष म्हणजे या योजनेत महिलांचा सहभाग लक्षणीय असून एकूण खात्यांपैकी ३२.८९ कोटी खाती महिलांची (तृतीयपंथीयांसह) आहेत, तर २६.१४ कोटी खाती पुरुषांच्या नावावर आहेत. मात्र, खात्यांची संख्या मोठी असली तरी त्यातील निष्क्रियतेचे प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. देशातील १५.३६ कोटींहून अधिक खाती अकार्यक्षम झाली असून ५.७२ कोटी खात्यांमध्ये शून्य शिल्लक आहे.

उत्तर प्रदेश-बिहार अव्वल
अकार्यक्षम आणि शून्य शिल्लक असलेल्या खात्यांच्या संख्येत उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्ये अव्वल स्थानावर आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ९५.९२ लाख शून्य शिल्लक खाती असून, बिहारमध्ये ६२.३५ लाख आणि महाराष्ट्रात ३६.०४ लाख खात्यांमध्ये शून्य शिल्लक आहे. तसेच अकार्यक्षम खात्यांच्या बाबतीतही उत्तर प्रदेश ३.२३ कोटी खात्यांसह प्रथम स्थानी आहे. बिहारमध्ये १.५९ कोटी, मध्य प्रदेशात १.३५ कोटी, तर महाराष्ट्रात सुमारे ९७.९४ लाख खाती बंद किंवा अकार्यक्षम स्थितीत आहेत.

केंद्राकडे काही माहितीची नोंद नाही
आरटीआयच्या उत्तरात १ सप्टेंबर रोजी स्पष्ट करण्यात आले की, जन धन खात्यांमधील जमा रक्कमेचे लिंगनिहाय वर्गीकरण किंवा १०० रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या खात्यांची स्वतंत्र नोंद केंद्र सरकारकडून मध्यवर्ती पातळीवर ठेवली जात नाही. याशिवाय गेल्या पाच वर्षांत बंद पडलेली खाती आणि सायबर फसवणूक किंवा संशयास्पद व्यवहारांमुळे गोठवण्यात आलेली खाती यांची माहितीदेखील केंद्र स्तरावर उपलब्ध नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31

Latest news