21.6 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeअंतरराष्ट्रीयजपानमध्ये अपघातात ५० वाहने पेटली; २६ जखमी

जपानमध्ये अपघातात ५० वाहने पेटली; २६ जखमी

टोकियो : वृत्तसंस्था
जपानमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा बर्फाळ हवामानामुळे मोठा अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, धुक्यामुळे परिसरात दृश्यमानता कमी होती, त्यामुळे दोन ट्रक एकमेकांवर आदळले.
या ट्रक अपघातानंतर एक्सप्रेसवेचा एक भाग बंद झाला. मागून येणारी वाहने बर्फाळ रस्त्यावर वेळेत ब्रेक लावू शकली नाहीत आणि बघता बघता ५० हून अधिक वाहने एकमेकांवर आदळली. टक्कर झाल्यानंतर वाहनांना आग लागली.
हा अपघात गुन्मा प्रांतातील मिनाकामी शहरात कान-एत्सु एक्सप्रेसवेवर झाला. यात ७७ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले. अपघाताच्या वेळी नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना सुमारे सात तास लागले. पोलिसांची चौकशी, ढिगारा हटवणे आणि रस्त्याच्या साफसफाईमुळे एक्सप्रेसवेचे काही भाग अजूनही बंद आहेत. येथे शुक्रवारी रात्री उशिरा मोठ्या हिमवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला होता, परंतु सुट्ट्यांमुळे लोक फिरण्यासाठी बाहेर पडत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR