नागपूर: प्रतिनिधी
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. जयदीप आपटे हा अनुभव नसलेला मूर्तीकार होता. तरीही त्याला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम कसे देण्यात आले? शिवरायांच्या या पुतळ्याच्या डोक्यात कापूस आणि कागद असल्याचे निदर्शनास आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते गुरुवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी नाना पटोले यांनी सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरुन भाजपवर गंभीर आरोप केले. या सगळ्या कामात राज्य किंवा केंद्राचं सरकार असेल त्यांनी घाई केली आहे. जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे.
अशा माणसाला काम देण्याचे कारण काय? महाराजांचा अपमान करण्याचा धाडस दाखवण्याचा प्रयत्न कसा केला? महाराजांचा पुतळा उभारला गेला आणि ८ महिन्यांतच तो कोसळतो. त्यात शिल्पकार आणि आर्किटेक्ट जबाबदार नाही तर राज्य सरकार जबाबदार आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले. बदलापूर असोकिंवा शिवाजी महाराजांचा पुतळा असो, फडणवीस सगळ्याला राजकारण म्हणतात. हा राजकारण नाही हा आस्थेचा प्रश्न आहे. या कमिशनखोरीला कुठले राजकारण म्हणायचे?, असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला.
हे निवडणूक कधी घेतात,आपल्या सोयीने निवडणुका लावतात. केंद्र आणि राज्य सरकार राजकारण करत आहेत. काँग्रेसचा अहवाल किंवा सर्व्हे नाही. प्रसारमाध्यमांवर चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. लोकसभेत जसा होता तसाच विधानसभेतही लोक आमच्या बाजूने आहेत. महाविकास आघाडी २०० वर जागा महाविकास आघाडी येईल, असा आमचा सर्व्हे असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
हे माज आलेला सरकार आहे, माज आलेली व्यवस्था आहे. माज आलेले व्यवस्था निर्माण झाली आहे, त्यांच्या घरी सौभाग्यवती, मुलांना,पोलिसांना शिव्या दिल्या जातात, पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले जातात. ते सांगतात सागर बंगल्याचा माझ्यावर आशीर्वाद आहे. भाजपचा सत्तेचा माज आहे. त्याचाच परिणाम आहे पोलिसांना आणि डायरेक्ट पत्रकारांनासुद्धा भाजपच्या खासदाराने धक्के मारले, असे नाना पटोले यांनी म्हटले.
या सरकारमध्ये गुंड माफिया यांना वाय प्लस सेक्युरिटी दिली आहे. त्यामुळेच चंद्रकांत पाटील गुंडाबरोबर आहेत. गुंड आणि माफियांबरोबर फोटोसेशन या महाराष्ट्रात केले जाते. त्यामुळे हा महाराष्ट्र असुरक्षित झाला आहे. सरकार ईडीच्या माध्यमातून धमकवते. जे गुन्हेगारही नाही त्यांनाही जेलमध्ये टाकले जात आहे. त्यामुळे कोर्टाने सरकारला फटकारले आहे, असेही नाना पटोले यांनी म्हटले.