Homeलातूरजलतारा प्रकल्प चळवळ बनल्यास अधिक फायदा

जलतारा प्रकल्प चळवळ बनल्यास अधिक फायदा

अहमदपूर : प्रतिनिधी
शेतक-यांसाठी सर्वात महत्त्वकांक्षी असलेला जलतारा हा प्रकल्प शेतक-यांसाठी चळवळ बनली पाहिजे तरच हा प्रकल्प प्रत्येकाच्या शेतात होऊ शकतो आणि प्रत्येकाच्या शेतात वाहून जाणारे पाणी थांबून शेतक-यांना त्याचा अधिकचा फायदा होऊ शकतो, असे  प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी या तालुक्यातील खंडाळी येथे जलतारा उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
  खंडाळी तालुका अहमदपूर येथे नाम फाउंडेशन व सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमानाने जलतारा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. विचार पीठावर अशोकराव माने, नाम फाउंडेशनचे विलास चामे, सिद्धी शुगर साखर कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी.जी. होनराव, बाबुराव कदम, राम नरवटे, संभाजी नागरगोजे, उमाकांत पौळ, पी.एल. मीटकर, बापूसाहेब जाधव, बाबुराव पौळ, रामराव पौळ, रामराव पाटील, संदीप पाटील, शिवाजी नरवटे, यशवंत टाळे ,अविनाश देशमुख ,बळी पाटील, संतोष कदम ,मंगेश शेळके ,उत्तमराव पौळ, केशव माने, अमोल पौळ, रामकिशन पौळ, मारुती माने, विठ्ठल राठोड हे उपस्थित होते.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, जलतारा या प्रकल्पामुळे शेतीचे उत्पादन वाढते.जलतारा हा प्रकल्प शेतक-यांसाठी वरदान असून आपण सर्वांनी जलतारा प्रकल्प आपल्या शेतात राबविला पाहिजे. या प्रकल्पासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असून लोक सहभागाशिवाय या कामात गोडवा व आनंद येणार नाही. या प्रकल्पाच्या माध्यमातून मतदारसंघ हा पाणीदार करणार असून आपण सर्व शेतक-यांनी या प्रकल्पासाठी पुढे यावे ,आपला सिद्धी शुगर साखर कारखाना सर्व शेतक-यांच्या पाठीशी असल्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धी शुगर कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी.जी. होनराव यांनी केले. यावेळी विलास चामे, बाबुराव कदम, अशोक कासले यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद चोपणे यांनी तर आभार मंगेश शेळके यांनी मानले. या कार्यक्रमास खंडाळी गावासह परिसरातील अनेक गावातील विविध शेतक-यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR