जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात शिवसेना शिंदे गटात तालुक्यातील अनेक गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला. दि. ९ ऑक्टोबर रोजी जळकोट येथे झालेल्या कार्यक्रमात या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश झाला. हा पक्षप्रवेश शिवसेनेचे राज्य समन्वयक तथा उपनेते माजी आ. डॉ. राजन साळवी यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. ब्रम्हाजी केंद्रे, उपजिल्हाप्रमुख तथा वाहतुक सूना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तानाजी चंदावार, डॉ. सूर्यकांत माळहिप्परगे, रविशंकर ऐनाले, साहेबराव पाटील सोरगेकर, नाथराव कराड किसान सेनामहाराष्ट्र, युवा सेना जिल्हाप्रमुख युवराज वंजारी, तालुकाप्रमुख मुक्तेश्वर पाटील, माजी तालुकाप्रमुख उमाकांत इमडे, आदीची प्रमुख उपस्थिती होते.
याप्रसंगी राजन साळवी बोलताना म्हणाले की येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी अतिशय जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. आपले नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यामध्ये शिवसेना मजबूत झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले आहे यापुढे देखील कार्यकर्त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवल्या जातील. जळकोट तालुक्यामध्ये शिवसेना हा नंबर एकचा पक्ष व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच त्यांनी जळकोट तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिका-यांचे कौतुक देखील केले. शिवसेनेचा डॉक्टर सेल अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. याबद्दल त्यांनी डॉक्टर तानाजी चंदावर यांचे देखील अभिनंदन केले.

