जळकोट तालुक्यातील साठवण, पाझर तलाव रात्रीत भरले

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहर तसेच तालुक्यातील अनेक गावामध्ये दि २२ जूनच्या रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. रात्री ८ वाजता पाऊस सुरु झाला आणि रात्री २ वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडला. एकाच रात्रीत झालेल्या पावसाने कमाल केली, अनेक साठवण तलाव तसेच पाझर तलाव भरले आहेत. जळकोट तालुक्यातील तिरु नदी या पावसामुळे ओसंडून भरून वाहत होती.  यामुळे जळकोट तालुक्यातील पाणीटंचाई काही अंशी कमी झालेली आहे .
यावर्षी किती पाणीटंचाई भासणार या चिंतेत जळकोट तालुक्यातील नागरिक होते. तालुक्यातील सर्वच साठवण तलावांमधील पाणीसाठा संपत आला होता तर अनेक साठवण तलाव कोरडे पडले होते मात्र एकाच रात्रीच्या पावसाने कमाल केली, अनेक साठवण तलाव तसेच पाझर तलाव भरले आहेत. जळकोट तालुक्यातील तिरु नदी या पावसामुळे ओसंडून भरून वाहत होती. या पावसामुळे जळकोट परीसरातील अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला होता. पहिल्याच मान्सूनच्या पावसाने शेतीची दाणादाण उडवली . एका शेतक-यांच्या शेतीचे  पाणी दुस-या शेतक-यांच्या शेतात घुसले, बांध फुटले. शेतक-यांची शेत जमीनीवरील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली. यामुळे शेतक-यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले .
  यासोबाच वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत . तसेच अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाली आहेत तसेच रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. यामुळे जळकोट, कोळनूर, पाटोदा खु, परीसरातील पाझर तलाव १०० टक्के भरले आहेत तर दि २२ जूनपर्यंत कोरडा पडलेला जंगमवाडी साठवण तलाव एकाच पावसात ८० टक्के भरला आहे तर हळदवाढवणा साठवण तलावही ८० टक्के भरला आहे.  यासोबतच माळहिपरगा तसेच रावणकोळा परिसरात असणा-या अनेक तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इतर तलावातही ५० टक्केंच्यावर पाणीसाठा जमा झाला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news