22.6 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeलातूरजळकोट तालुक्यात टपाल सेवा आजही भक्कम

जळकोट तालुक्यात टपाल सेवा आजही भक्कम

जळकोट : प्रतिनिधी
भारत देशात सर्वात जुनी आणि सर्वसामान्य ग्रामीण व शहरी भागात टपाल सेवा ही फार महत्त्वाची होती. इंग्रजांच्या काळापासून ही टपाल सेवा सुरू आहे. यात मुलींसाठी समृद्धी, सुकन्या योजना, स्पीड पोस्ट, आरटीजीएस, बचत खाते, आरडी ठेव, विमा सेवा या योजना आहेत. व्याजदर कमी असला तरी विश्वासार्हतेमुळे अनेक वर्षापासून या सेवेवर जनतेचा विश्वास दृढ झाला
आहे.
पूर्वीच्या काळी फोन, मोबाईल नव्हते. त्या काळात एखादी आनंदाची बातमी किंवा दु:खद बातमी तारद्वारे मोजक्या शब्दात पोस्टमन घरी येऊन निरोप द्यायचा किंवा कर्मचा-यांचा अभाव तरीही विश्वास मात्र अढळ वाचून दाखवायचा. त्या काळामध्ये आरटीजीएस नव्हते. त्या काळामध्ये टपाल खात्यामार्फत घरपोच सेवा पोस्टमन करत असत. आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगातही टपाल सेवा आरटीजीएस, स्पीड पोस्ट, आधार लिंक, पासपोर्ट काढण्यासाठी सुद्धा टपाल सेवेचा वापर केला जात आहे. या पोस्ट ऑफिसमध्ये मात्र जुन्या काळात असणारे तारखेचे शिक्के, लोखंडी अक्षरे जुळवून आजही शाईत बुडवून मारले जातात. लोखंडी अक्षरे जुळवली जातात. या टपाल सेवा म्हणजे ग्रामीण भागातील धन्वंतरी आहेत.
आज या पोस्ट खात्यात लाडकी बहीण योजना असो की, आणखी कोणत्या योजना टपाल कार्यालयातील गर्दी वाढतच आहे. टपाल सेवेच्या पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचा-यांचा मात्र अभाव आहे. कर्मचारी भरती करणे गरजेचे आहे. टपाल सेवा कायमस्वरूपी सुरळीत चालण्यासाठी केंद्र सरकारने अधिकाधिक भरती करून आणखी चांगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न
करावा, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR