जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात दि ९ एप्रिल रोजी वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला, यामुळे आंबा उत्पादक शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जळकोट तालुक्यात अनेक गावात आंब्याच्या झाडाखाली अक्षरश: आंब्याचा सडा पडलेला दिसून आला.
जळकोट शहर तसेच परिसरात आंबा उत्पादक शेतक-यांंचे मोठे नुकसान झाले तसेच तिरुका येथेही नुकसान झाले. यासोबतच केकतंिसंदगी परिसरात अंबा बागेचे मोठे नुकसान झाले. कृषी विभागाच्या वतीने पंचनामे सुरू झाले आहेत. सुरुवातीला झालेल्या पंचनाम्यानुसार तालुक्यामध्ये दहा एकर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या वतीने पंचनामे सुरूच आहेत , जवळपास जळकोट तालुक्यामध्ये २५ एकर क्षेत्रावरील फळ बागांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे तात्काळ जळकोट तालुक्यात नुकसान झालेल्या आंबा उत्पादक शेतक-यांंना तसेच अन्य फळबागांचे नुकसान झालेल्या शेतक-यांंना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.