23.8 C
Latur
Wednesday, March 11, 2026
Homeलातूरजळकोट तालुक्यात सरासरी ६३ टक्के मतदान

जळकोट तालुक्यात सरासरी ६३ टक्के मतदान

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी दि ७ फेब्रुवारीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एक-दोन ठिकाणी अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांतते पार पडली. तालुक्यामध्ये जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले.

जळकोट तालुक्यात २१ हजार १९६ पुरुष मतदारांनी तर १९८१३ स्त्री मतदारांनी अशा एकूण ४१००९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला . जळकोट तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी झालेल्या गावनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. वडगाव – ७२ टक्के, सोरगा – ६३ टक्के , शेंलदरा – ६२ टक्के, उमरगा रेतू – ६३ टक्के , चेरा- ६५ टक्के , वांजरवाडा – ६७ टक्के , होकर्णा – ६४ टक्के, उमरदरा – ६७ टक्के, केकत शिंदगी – ६६ टक्के , चाटेवाडी – ६४ टक्के, धामणगाव ६४ टक्के, डोमगाव – ५४ टक्के, हावरगा- ७१ टक्के, येलदरा – ६८ टक्के, जगळपूर – ६२ टक्के, जिरगा – ७१ टक्के, विराळ – ६० टक्के, कंरजी – ६३ टक्के, पाटोदा बु – ६१ टक्के, कुणकी- ५५ टक्के, हळद वाढवणा – ६४ टक्के , रावणकोळा – ६० टक्के , माळहिप्परगा ( शिवाजीनगर ) – ६५ टक्के , पाटोदा खुर्द – ६३ टक्के , डोंगरगाव – ५८ टक्के, कोळनूर – ७० टक्के , डोंगर कोणाळी – ६० टक्के, ढोरसांगवी – ६६ टक्के, सोनवळा -६० टक्के, धनगरवाडी – ७१ टक्के, लाळी बुद्रुक – ६० टक्के, मंगरूळ – ६६ टक्के, लाळी खुर्द – ६४ टक्के, बेळसांगवी ६१ टक्के, येवरी – ५७ टक्के, बोरगाव – ६१ टक्के , एकुरका -५९ टक्के, घोणशी – ६४ टक्के, खंबाळवाडी – ७९ टक्के, धोंडवाडी – ६८ टक्के , तिरका – ५९ टक्के, सुलाळी – ५९ टक्के , मरसांगवी – ७१ टक्के , अतनूर – ५४ टक्के, गुत्ती – ६१ टक्के, रामपूर तांडा – ६२ टक्के, हळद वाढवणा – ६३ टक्के, फकरू तांडा – ६० टक्के, गव्हाण – ५९ टक्के , मेवापूर – ५५ टक्के, शिवाजीनगर तांडा – ४८ टक्के , चिंचोली – ६१ टक्के, अग्रवाल तांडा- ५० टक्के, असे एकूण जळकोट तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट व ६ पंचायत समिती गणासाठी ६३ मतदान झाले.

जळकोट तालुक्यात मेवापूर येथे काँग्रेसच्या उमेदवार शांताबाई आदावळे यांचा मुलगा रमणकुमार अदावळे यांनी मतदान प्रक्रियेसंदर्भात काही आक्षेप घेतले होते, असे किरकोळ प्रकार वगळता जळकोट तालुक्यात शांततेमध्ये मतदान पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वाती दाभाडे हे काम करीत आहेत तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार राजेश लांडगे हे काम करीत आहेत .

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR