जळकोट तालुक्यात ३ मतदान केंद्रांवर आज मतदान

जळकोट : प्रतिनिधी
औरंगाबाद (संभाजीनगर) विभाग पदवीधर मतदार संघासाठी आज  दि २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे . जळकोट तालुक्यातील मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जळकोट तहसील कार्यालयातून तीन मतदान केंद्रावर मतदान अधिकारी तसेच इतर कर्मचारी साहित्यसह रवाना करण्यात आले .
सकाळी ८ ते ४ या वेळेमध्ये मतदान होणार आहे . जळकोट तालुक्यात एकूण १४८१ मतदार आहेत हे मतदार दि २३ रोजी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जळकोट तालुक्यामध्ये औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी जळकोट शहरात दोन तर तालुक्यातील घोनशी येथे एक असे तीन मतदान केंद्र आहेत . जळकोट येथील दोन मतदान केंद्रावर ६७० पुरुष मतदार तर १७९ महिला मतदार असे एकूण ८५९ मतदार आहेत  तर घोणसी येथील मतदार केंद्रावर ५२८ पुरुष मतदार तर ९४ महिला मतदार आहेत. या ठिकाणी ६२२ मतदार आहेत.
जळकोट तालुक्यातील या तीन मतदान केंद्रावर कर्मचारी रवाना झाले. यावेळी तहसीलदार राजेश लांडगे यांनी मतदान केंद्रांवर रवाना होणा-या वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा झोनल अधिकारी  रोहित आरबोळे, नायब तहसीलदार श्रीमती ज्योती जिगळे, रंगनाथ कराड,  सुहास मुजळकर , सहायक महसूल अधिकारी वैजनाथ पवार, रवी गाजरे, अधिकारी प्रीती पाटील,  मंडळ अधिकारी हंसराज जाधव, ग्राम महसूल अधिकारी अतीक शेख, रुदेवाड, निवडणूक विभागाचे अलीम शेख  उपस्थित होते . यावेळी तहसीलदार राजेश लांडगे यांनी जळकोट तालुक्यातील तीन मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40
Video thumbnail
Latur District Bank Election: मतदार अपहरण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
03:42
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
01:02:37
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
21:37
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36

Latest news