जागृतीकडून उसाला प्रती टन ३ हजार रुपयांचा हप्ता

लातूर/देवणी : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील खाजगी साखर उद्योगात एफआरपीपेक्षा अधिक भाव देणा-या देणा-या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजकडून गळीत हंगाम २०२६-२७ च्या चालू गाळप हंगामात २१ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ४७, ९७३ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर उसाचा पहिला हप्ता ३ हजार रुपयेप्रमाणे एकूण १४ कोटी ३९ लाख २० हजार रुपये खात्यावर जमा झाले आहेत.
दीपावली सणास सुरुवात होण्याअगोदर जागृतीकडून ऊस उत्पादक शेतक-यांची दिवाळी गोड केली आहे. ज्या ऊस पुरवठा शेतक-यांनी दि २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत  कारखान्यास ऊस पुरवठा केला आहे. त्या ऊस पुरवठा शेतक-यांची बिलाची रक्कम खात्यावर जमा केली असून त्यांनी बिलाची रक्कम उचलून घ्यावी, असे आवाहन जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, सरव्यवस्थापक गणेश येवले यांनी केले आहे.
ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर १० दिवसांत बिल जमा
चालू गाळप हंगामात २ नोव्हेंबर २०२६ अखेर जागृती शुगर कारखान्याने एकूण ५७, ४९० मे. टन उसाचे गाळप केले असून कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी पहिला हप्ता ३ हजार रुपये व १० दिवसांत बिल देण्याची घोषणा केली होती. जो शब्द दिला होता तो पाळला असून शेतक-यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दिवाळीपूर्वी अगदी १० दिवसांत गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर बिलाची रक्कम जमा झाली आहे. यामुळे जागृती शुगरच्या कार्यक्षेत्रातील देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, उदगीर व परिसरातील तालुक्यातील ऊस उत्पादकांची दिवाळी गोड होणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18

Latest news