जातनिहाय जनगणनेचा निर्णय ‘काँग्रेस’चे यश

कराड : प्रतिनिधी
केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु काँग्रेस, तसेच राहुल गांधी यांनी यापूर्वीच जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली होती. त्यावेळी भाजपने काँग्रेसवर टीका केली होती. शेवटी त्यामागची आमची भूमिका लक्षात घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही स्वागत करत असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

केंद्र सरकारने या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर केलेले नसल्याने ते जाहीर करावे अशी मागणी करून चव्हाण म्हणाले, दशकीय प्रशासकीय जनगणना झालेली नाही. शेवटची जनगणना सन २०११ साली झाली. त्यानुसार २०२१ मध्ये ती पुन्हा होणे आवश्यक होते. मात्र, सरकारने कोरोना महासाथीचे कारण देऊन ते टाळले.

वास्तविक, जगातील ७१ देशांनी त्यांची जनगणना पूर्ण केली. मात्र, भारत सरकारने ते टाळले, ही वस्तुस्थिती आहे. जनगणना करून समाजाचे वास्तव समाजासमोर आणणे गरजेचे आहे. मात्र, २०११ पासून आतापर्यंत दहा वर्षांतून एकदा अपेक्षित असणारी जनगणना झाली नाही. आता त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. या जनगणनेमध्ये जातवार वर्गीकरण होणार आहे, हे अतिशय महत्त्वाचे. ज्याची काँग्रेस अनेक वर्षांपासून मागणी करत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे. अन्यथा, त्याचा निवडणुकीशी काहीतरी संबंध आहे, असे लोकांचे मत होऊ शकते. परंतु, सरकारच्या डोक्यात तसे काही नसेल, असे चव्हाण यांनी सांगितले.

जनगणना करताना माहिती कशी गोळा करायची, त्याची रचना असणे गरजेचे आहे. त्याचीही विस्तृत चर्चा करून पुढचे पाऊल उचलले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जनगणना हा विषय सन १८८१ पासून सुरू झाला आणि त्यावेळीपासून भारतामध्ये जनगणना करत असताना आपण जातनिहाय माहिती गोळा करत होतो. सन १९३१ मध्ये झालेली शेवटची जातनिहाय जनगणना ठरली. त्यानंतर आपण जातनिहाय माहिती गोळा करणे थांबवले. आता जातनिहाय जनगणना करताना बिहार आणि तेलंगणा राज्यांनी केलेल्या निरीक्षणाचाही विचार होणे गरजेचे आहे.

देशाच्या विकासाचे निर्णय घेताना जनगणना ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. वेळीच हा निर्णय न घेणे ही सरकारची फार मोठी चूक होती. मात्र, आता त्यामध्ये दुरुस्ती झाली. या निर्णयामुळे काँग्रेसची ब-याच वर्षांपासूनची मागणी मान्य झाली आहे. भाजपने आपली भूमिका बदलली आहे, ही गोष्ट देशासाठी अत्यंत चांगली असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

फडणवीस यांना ती माहिती नसेल
डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात काँग्रेसने जातनिहाय जनगणना करण्यास विरोध केला होता. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर विचारले असता, चव्हाण म्हणाले, त्यावेळी मी केंद्रात कार्यरत होतो. फडणवीस केंद्रात नव्हते, त्यांना याबाबत कदाचित माहिती नसेल. परंतु, सन २०११ मध्ये डॉ. सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारने जातनिहाय निरीक्षण (सर्व्हे) करायचा निर्णय घेतला होता. परंतु, या निरीक्षण प्रक्रियेत (सर्व्हे) अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे ही आकडेवारी एकदम प्रकाशित करणे योग्य नसल्याने डॉ. सिंग यांनी ती जाहीर केली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर मोदी सरकार आले. त्यांनी जुन्या निरीक्षणातील दोष, चुका, त्रुटी दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. डॉ. सिंग यांचा निर्णय मोदी सरकारने पुढे चालू ठेवला. मात्र, मोदींनीही सदरची माहिती प्रकाशित केली नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे चव्हाण यांनी या वेळी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31

Latest news