30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeमहाराष्ट्रजालन्यात दोन गटांत तुफान राडा;मारहाणीत १५जण जखमी

जालन्यात दोन गटांत तुफान राडा;मारहाणीत १५जण जखमी

जालना : प्रतिनिधी
महापालिका निवडणूक २०२६ निकालानंतर दोन गटांत लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली आहे. काँग्रेसचे सय्यद रहीम आणि शिवसेनेचे शेख जावेद यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये ही घटना घडली आहे. या मारहाणीत १० ते १५ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

यावेळी झालेल्या हाणामारीत चार ते पाच जणांची डोकी फुटली असून एक-दोन जणांच्या हातावर शस्त्रांनी वार करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्हीही गटांतील १० ते १५ जण जखमी झाले. जखमींवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या हाणामारीदरम्यान दगडफेक देखील करण्यात आली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक साबळे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR