22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeलातूरजिल्हा परिषदअंतर्गत शिक्षक बाहेर जिल्ह्यात जाणार

जिल्हा परिषदअंतर्गत शिक्षक बाहेर जिल्ह्यात जाणार

औसा :  प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या सन २०२४-२५ संच मान्यतेनुसार झाल्यास ३५० शिक्षकांना ऑफलाईन बदल्यास सामोरे जावे लागेल तर १०३ शिक्षकांना जिल्ह्यात एकही रिक्त जागा राहणार नसल्यामुळे शिक्षकांवर टांगती तलवार असल्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या सन २०२३-२४ च्या संचमान्यतेवरच करण्यात याव्यात, अशी मागणी औसा शिक्षक संघाचे अध्यक्ष महादेव खिचडे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
          जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्याचे वारे सुरू आहे. संचमान्यता शालेय शिक्षण विभाग करणार असून शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ग्रामविकास विभाग करणार आहे. या दोन विभागांचा समन्वय नसल्यामुळे पतसंख्या असून ही पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचे शिक्षक अतिरिक्त होऊन जिल्हा बाहेर जाणार आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया गेल्या दोन महिन्यापासून चालू होती, त्यामध्ये सन २०२३-२४ संच मान्यतेनुसार ऑनलाईन पोर्टलवर प्रत्येक शाळेची संख्या भरण्यात आली होती. २०२३-२४ संचमान्यतेनुसार लातूर जिल् तील कोणत्याही शिक्षकाला ऑफलाईन बदलीला सामोरे जाण्याची किंवा अतिरिक्त होण्याची वेळ येणार नाही.
परंतु अचानक ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी व्हीसी घेऊन/ऑनलाईन विषय घेऊन त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिका-यांना यावर्षीच्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या सन २०२४-२५ संच मान्यतेनुसार करण्यात याव्यात अशा सूचना दिल्या. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिका-यांनी जिल्हा अंतर्गत बदलीसाठी दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी निश्चीत केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या सन २०२४-२५  च्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त पदे नोंदविण्यात यावेत असे लेखी पत्र काढले.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड व्हॅलीड संख्येनुसार ग्रा  धरून संच मान्यता झाली असल्यामुळे पदवीधर, मुख्याध्यापक आणि शिक्षक ही पदे १५ मार्च २०२४ जीआर नुसार खुप प्रमाणात कमी झाली आहेत. सन २०२४-२५ संच मान्यतेनुसार ऑनलाईन बदल्या झाल्यास व लातूर जिल्ह्यात बदलीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यास ३५० शिक्षकांना ऑनलाईन बदलीने जागा मिळणार नाही. जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधर, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या रिक्त जागेवर देऊनही सरासरी १०३ शिक्षक लातूर जिल्ह्यात अतिरिक्त होत आहेत. याबाबत न्यायालयात रीट याचिका दाखल असून यामध्ये समायोजन म्हणजेच बदल्या आहेत अशी शासनाची भूमिका असून याने न्यायालयाचा अवमान ही होणार आहे, असे असूनही शासनाचा २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसारच बदल्या करण्याचा आग्रह आहे. ३० सप्टेंबर २०२४ च्या पटसंख्येनुसार ८५ टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड असल्याने संचमान्यता ग्रा  धरण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातील ३५० शिक्षकांना ऑफलाईनने गणित विज्ञान प्राथमिक पदवीधर वर किंवा मुख्याध्यापकाच्या पदावर तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती देणे किंवा लातूर जिल्ह्यातून एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही म्हणून यावर्षी होत असलेल्या ऑनलाईन बदल्या सन २०२३-२४ च्या संच मान्यतेवरच कराव्यात अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक संघ औसा तालुका अध्यक्ष महादेव खिचडे यांनी शिक्षणमंत्री यांना निवेदनाव्दारे केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR