Homeलातूरजिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

लातूर : प्रतिनिधी
रेणापूर शहर काँग्रेसची नवीन कार्यकारिणी शहराध्यक्ष नितीन मोटेगावकर यांनी जाहीर केली. नवनियुक्त पदाधिका-यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. नव्या कार्यकारिणीत अनुभवी व युवा नेतृत्वाचा समतोल साधण्यात आल्याने पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
नूतन कार्यकारिणी सर्वसमावेशक असून सर्व घटकांना सोबत घेऊन काँग्रेस पक्षाची ताकद रेणापूर शहरात अधिक मजबूत करेल. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बांधणी, बूथस्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे अधिक मजबूत करणे तसेच जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ही कार्यकारिणी सक्रियपणे कार्य करेल आणि पक्षाच्या धोरणांची अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचवेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी सर्व नूतन कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी रेणापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष नितीन मोटेगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, जिल्हा परिषद काँग्रेस गटनेत्या आशाताई भिसे, रेणापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद कापसे, लातुर ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते पंडित माने, प्रदीप राठोड, गटनेते गजेंद्र चव्हाण, सचिन मोटेगावकर, पद्म पाटील आदींची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR