23.9 C
Latur
Tuesday, September 10, 2024
Homeलातूरजिल्हा बँकेचे शेतकरी ग्राहक करणार झटपट पेमेंट

जिल्हा बँकेचे शेतकरी ग्राहक करणार झटपट पेमेंट

लातूर : प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना डिजीटल बँकींगच्या क्षेत्रात आणखी एक पाऊल टाकले आहे. बँकेने आपल्या शेतकरी व ग्राहकांसाठी युपीआयची (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) सुविधा उपलब्ध केली असून या सुविधेआधारे ग्राहक आता फोन पे, गुगल पे सह युपीआयच्या अन्य प्लॅटफॉर्मवरून झटपट आर्थिक व्यवहार करू शकणार आहेत. बँकेचे अध्यक्ष लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी स्वत: व्यवहार करून युपीआय सुविधेचा प्रारंभ केला. युपीआय सुविधा देणारी लातूर ही मराठवाड्यातील पहिलीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शक सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी बँकेची धुरा हाती घेतल्यापासून बँकेची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू आहे. सध्या डिजीटल पेमेंटचे युग असून सर्वसामान्य ग्राहक व शेतकरीही मोबाईलवरून डिजीटल व्यवहार करत आहेत.
डिजीटल व्यवहाराचे प्रमाण वाढत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेतूनही अन्य बँकांच्या बरोबरीने या सुविधा देण्याचे नियोजन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने केले. काही वर्षात त्यासाठी अत्याधुनिक प्रणाली उपलब्ध करण्यासोबत ती हाताळण्यासाठी बँकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर एकानंतर एक अशा डिजीटल बँकींगच्या सुविधा सुरू करण्यात आल्या. आता युपीआय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून अन्य बँकेप्रमाणे ग्राहकांना एटीएमच्या साह्याने ही सुविधा आपल्या मोबाईलवर सुरू करता येणार आहे.
सध्या बँकेचे एटीएम कार्डधारक चोवीस हजार ग्राहक आहेत. या ग्राहकांना लगेच युपीआय सुविधा उपलब्ध होणार असून ग्राहकांच्या मागणीनुसार बँकेकडून तातडीने एटीएम कार्ड वितरण सुरू आहे. ग्राहकांनी युपीआय सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.
जिल्हा बँकेच्या डिजीटल सुविधा
एटीएम सेवा व या सेवेमध्ये टिएपी अ‍ॅन्ड जीओ म्हणजेच वायफायद्वारे एटीएम पिन न नोंदविता व्यवहार करण्याचीही सुविधा, मोबाईल बँंिकग सुविधा. याद्वारे ग्राहकांना मोबाईलवरून ऑनलाईन व्यवहार करता येतात. यासोबत खाते उतारा काढणे व खातेवरील शिल्लक रक्कम पाहता येते., मोबाईल एटीएम व्हॅन सुविधा. याद्वारे  बँकेची शाखा नसलेल्या गावांमध्ये ग्राहकांना घरपोच बँकींग सुविधा देण्यात येतात, मोबाईल बँंिकग अ‍ॅपची सुविधा. याद्वारे ग्राहकांना मोबाईल मधुन आयएमपीएस व एनइर्एफटीद्वारे इतर बँकेच्या ग्राहकास पैसे पाठविता येतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR