लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी व गटसचिव संघटनेच्या वतीने जिल्हा बँकेच्या मुख्यालयात दि. १८ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात १०२ कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वैजनाथराव शिंदे व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, संचालक पृथ्वीराज सिरसाठ, अशोक गोविंदपूरकर, अँड. राजकुमार पाटील, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण, जिल्हा परीषद सदस्य दत्तात्रय टेकाळे, श्रीकांत (बाळू) माने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश बेद्रे, डॉ. उमाकांत जाधव, युवक काँग्रेसचे अध्यक्ष पाटील, अँड कालिदास देशपांडे, संभाजी सुळ, सचिन दाताळ, हरीराम कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

