लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात मागील १० ते १५ दिवसांपासून दररोज कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे सरकला होता. शनिवारी या कमाल तापमानामध्ये चार अंशांची घट झाली असल्याचे समोर आले आहे. गुरूवारी कमाल तापमान ३९ अंशं सेल्सिअस नोंद झाले होते. शहर परिसरात दररोज तापमाणात सातत्याने वाढ होत असल्याने दुपारच्या वेळी शहरातील रस्ते निर्मनुष्य झालेले दिसून येत होते. या दरम्यान गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागांमध्ये वा-यासह आवकाळी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसापासून जिल्‘ातील तापमाणत घट झाली असून नागरीकांना थोडसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी पडलेल्या वा-यासह आवकाळी पाऊसामुळे तापमानात दोन अंशांनी घसरुन ३९ अंशांवर आले असले तरी उष्णतेच्या लाटेची तीव्रता तेवढीच जाणवत होती. गेल्या पंधरा दिवसापासून उष्णतेच्या लाटेत होरपळून निघालेल्या लातूरकरांसाठी मे महिन्यातील प्रत्येक दिवस उष्णतेची नवीन आव्हाने घेऊन येत असे मात्र गेली दोन ते तीन दिवस झाले काही प्रमाणात नागरीकांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठड्यातील शहराचे कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे असल्याने नागरीकांना उष्णतेचा सामना करावा लागला यानंतर गुरूवारी त्यात २ अंशांची घट झाली होती. काल शनिवारी पुन्हा दोन अंशाने तापमान घटले. काल दुपारच्या काळात जिल्ह्यातील अचानक ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे शिहरातील तापमानाचा पारा अजून २ अंशांनी घटला आहे. शनिवारी तापमान कमी असले तरी वेगाच्या वा-यामुळे उष्णतेच्या झळा काही प्रमाणात जाणवत होत्या. रात्रीचा पारा ३० अंशांवर स्थिर असल्याने दिवसासोबतच रात्रीचा उकाडा अस‘ करणारा ठरत आहे.