जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी १५१ विहिरींचे अधिग्रहण

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, जिल्हा परिषद प्रशासनाकडून विविध उपाययोजना वेगाने राबविल्या जात आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात ३ टँकर आणि १५१ विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.  सद्यस्थितीत जिल्ह्यातील केवळ जळकोट तालुक्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, तेथील ३ गावे आणि १ वाडी, अशा एकूण ४ टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. यामध्ये १ खाजगी आणि २ शासकीय मिळून एकूण ३ टँकर मंजूर करण्यात आले आहे. या टँकर्सच्या माध्यमातून मंजूर केलेल्या ६ खेपांनुसार प्रत्यक्ष पाणीपुरवठा केला जात आहे. जळकोट तालुक्यातील शिवाजी नगर तांडा व वाघमारी तांडा येथे १० एप्रिल २०२६ पासून आणि गव्हाण येथे २४ एप्रिल २०२६ पासून टँकर मंजूर करण्यात आले असून, वंजारवाडा येथे १ जून २०२६ पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सध्या टँकरसाठी ३ आणि टँकरव्यतिरिक्त इतर पाणीपुरवठ्यासाठी १४८ अशा एकूण १५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या अधिग्रहित विहिरींच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण १२५ गावे व वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ५२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, त्याखालोखाल औसा तालुक्यात ३५, जळकोट तालुक्यात १५, निलंगा तालुक्यात १३, उदगीर तालुक्यात ११, रेणापूर तालुक्यात ८, चाकूर तालुक्यात ५, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ६, लातूर तालुक्यात व  देवणी तालुक्यात प्रत्येकी ३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
17:00
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
00:00

Latest news