जिल्ह्यात लातूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान

रेणापूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी दि २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यत ३ लाख ३४ हजार ६०५ मतदारापैकी २ लाख ३३ हजार ९५० जणांनी मतदानाचा हक्क बजावला ६९. ९२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात ६ विधानसभा मतदारसंघात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले .
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात  एकूण ३ लाख ३४ हजार ६०५ मतदार आहेत. त्यात १ लाख ७६ हजार पुरुष तर १ लाख ५८ हजार ६०१ महिला असून, ३५८ सैनिक तर ४ तृतीयपंथी मतदारांची संख्या आहे. जे मतदार मतदान केंद्रापर्यंत मतदानासाठी येऊ शकत नाहीत अशा मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती . लातूर ग्रामीण मतदारसंघात एकूण ३६३ मतदान केंद्र होती . त्यात रेणापूर तालुक्यात १३६, लातूर तालुक्यात  १८१ तर औसा तालुक्यात  ४६ मतदान केंद्र निश्चीत करण्यात आले होती.  १८ ते १९ वयोगटातील ३ हजार ९९१ मतदार असून ८५ वयोगाटाच्या पुढचे ८ हजार २७१ तर २ हजार ८१६ दिव्यांग मतदार आहेत.
यात दिव्यांग पुरुष १ हजार ८७८ व महिला ९३८ मतदार आहेत. ८५ वयोगटाच्या वरील मतदारांमध्ये पुरुषांची संख्या ८ हजार २७१ एवढी असून त्यात ३ हजार ६६० पुरुष तर ४ हजार ६२१ महिलां मतदारांचा समावेश आहे. विधानसभेची निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पाडता यावी म्हणून मतदातसंघात विविध पथकांची व झोनची व्यवस्था करण्यात आली होती . त्यासाठी नोडल अधिकारी, आचारसंहिता पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथके, व्हिडीओ सर्वेक्षण पथके, व्हिडीओची सुविधा असलेली टिम अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती.  रेणापूर तालुक्यात ८५ वयोगटापेक्षा अधिक वयाचे २ हजार ६१७, औसा विभागात १ हजार ५० तर लातूर विभागात ४ हजार ६१४ मतदार आहेत. वयोवृद्ध मतदारांचे मतदान प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन करून घेण्यात आले आहे .
दरम्यान कॉग्रेस महाविकास  आघाडी चे उमेदवार धिरज देशमुख  महायुतीचे  उमेदवार  कराड यांच्या सह १६ उमेदवार निवडणुक ंिरगणात उभे होते .बुधवारी दि २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी  ६ वाजेपर्यंत  मतदान झाले ३ लाख ३४ हजार ६०५ मतदारापैकी  १ लाख २४ हजार ७४९  पुरुष मतदार तर १ लाख ९ हजार २०० महिला मतदार, इतर १ असे एकूण २ लाख ३३ हजार ९५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६९.९२ टक्के मतदान झाले.  रेणापूर तालुक्यात किरकोळ घटना वगळत मतदाना दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही अशी पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी दिली .

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56
Video thumbnail
Solapur|सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
01:42
Video thumbnail
Latur|नागलगाव परिसरातील पाझर तलाव कोरडे, जनावरांवर पाणीटंचाईचे संकट
01:15
Video thumbnail
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातील विहंगम सोहळा, डोळे दिपवून टाकणारा व्हिडिओ
00:40
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16

Latest news