जिल्ह्यात ३५ खासगी विहिरी, विंधन विहिरींचे अधिग्रहण

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई निवारण आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ७ मे रोजीच्या दैनंदिन अहवालानुसार, सध्या जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात २ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. तसेच जिल्ह्यात ३५ विहीर, विंधन विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जळकोट तालुक्यातील ३ गावे आणि १ वाडी मिळून ३,३१० लोकसंख्येला २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शिवाजी नगर तांडा व वाघमारी तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. गव्हाण येथेही २४ एप्रिल २०२६ पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासाठी २ शासकीय टँकरद्वारे दररोज ४ खेपा पूर्ण केल्या जात आहेत.
टँकर व्यतिरिक्त  ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथे प्रशासनाने खाजगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्हभरात ३५ खाजगी विहिरी, विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये औसा तालुक्यातील १० गावे तथा वाड्यांसाठी ११ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत, तर अहमदपूर तालुक्यातील १० गावांमध्ये १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.  उदगीर तालुक्यात ८ गावे तथा वाड्यांसाठी ८ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. रेणापूर व चाकूर तालुक्यात प्रत्येकी १ गावात विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे, तर जळकोट तालुक्यात टँकर भरण्यासाठी ३ आणि इतर २ अशा एकूण ५ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23
Video thumbnail
येलदरी जलाशयात मासेमारी नाकारल्याने मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
03:22
Video thumbnail
Nanded|कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाही-आ.हेमंत पाटील
03:09
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका सुरूच; लातूरचे FDA प्रशासन अजूनही झोपेत?
02:05
Video thumbnail
Latur Traffic Police|जीवघेण्या पद्धतीने वाहन अडवणारा ट्रॅफिक पोलीस निलंबित...
02:28
Video thumbnail
Latur MIDC|22 तासांच्या झुंजीनंतर MIDC मधील भीषण आग आटोक्यात; 5 कोटींचे नुकसान
03:48
Video thumbnail
धावत्या बाईकस्वाराला पाडणे पडले महागात; लातूरमध्ये 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर ट्रॅफिक पोलीस निलंबित!
00:19
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13

Latest news