नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने जारी केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ६ ऑक्टोबर २०२६ रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित अधिका-यांना त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुभाष पांडुरंग उन्हाळे यांची विमानतळ सुरक्षा येथून पोलीस ठाणे नायगाव येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ओमकांत आनंदराज चिंचोलकर यांची पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथून नियंत्रण कक्ष येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक अमोल हरिसास भगत यांची पोलीस ठाणे नायगाव येथून पोलीस ठाणे अधार्पूर येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक महादेव हनमंतराव मांजरमकर यांची पोलीस ठाणे अधार्पूर येथून विमानतळ सुरक्षा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक अशोक तुकाराम जाधव यांची नियंत्रण कक्ष येथून पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या सर्व पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी पदभार स्वीकारून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे संबंधित पोलीस ठाणे व विभागांच्या कामकाजात लवकरच नव्या अधिकाऱ्यांकडून सूत्रे स्वीकारली जाणार आहेत.या बदल्यांमुळे नायगाव, अधार्पूर, नांदेड ग्रामीण, नियंत्रण कक्ष आणि विमानतळ सुरक्षा या महत्त्वाच्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल झाला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच संबंधित विभागांचे कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने हा प्रशासकीय बदल करण्यात आल्याचे आदेशातून स्पष्ट होते.
















