लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनामध्ये, फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळा, अर्धवेळ परिचर यांना साडीवाटपचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील होत्या. याप्रसंगी आरोग्य व बांधकाम समिती सभापती ज्ञानेश्वर बिरादार, कृषी समिती सभापती कविता गोरे, दिलीपकुमार मटके, शाहिद पटेल, धर्मपाल देवशेट्टे, तानाजी बिरादार, माणिक गायकवाड, मुकेश भालेराव, दत्तात्रेय टेकाळे, चाटे, वसंत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सभापती बिरादार, माणिक गायकवाड, दिलीपकुमार मटके यांनी ग्रामीण भागातील आरोग्यसेवा देणा-या कर्मचा-यांचे कौतुक केले.
फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळ्यात स्वास्थ्य अभ्यंगता संवर्गात प्रथम पारितोषिक भांजे गीता बाबुराव, द्वितीय क्रमांक राठोड सविता नथू सिंग, तृतीय क्रमांक पुरी संतोष महेंद्र यांना पारितोषिक रकमेचा धनादेश व प्रमाणपत्र देण्यात आले आरोग्य सेविका अठट संवर्गात प्रथम पारितोषिक श्रीमती स्वाती अशोक कांबळे व द्वितीय क्रमांक श्रीमती मनीषा शिवाजी शिंदे यांना मिळाला. यांनाही पारितोषिकाची रक्कम धनादेशाद्वारे व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रतिनिधिक स्वरूपामध्ये नऊ अर्धवेळ स्त्री परिचर यांना साड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गवळी संगीता, साजेदा खान पठाण, कांबळे मीना, सोनाली लामतुरे, सुवर्णा कळसे, संगीता घोलप, नम्रता गरड, मीना सोनवणे, सविता कांबळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी
केले.
















