Homeलातूरजि. प. साठी फिफ्टी-फिफ्टीचा फार्म्युला

जि. प. साठी फिफ्टी-फिफ्टीचा फार्म्युला

लातूर : प्रतिनिधी
मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणा-या लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागेसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. जि. प. मध्ये सत्ता स्थापनेसाठी कोणत्याच पक्षाला बहूमत नसल्याने महायुतीचे स्वर निघू लागले. भूतोन: भविष्यतो अध्यक्ष पदाची संधी चालून आली असताना राष्ट्रवादी काँग्रेस मोहजाल मध्ये आडकला आहे. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला चूचकारून सत्तेसाठी आडीच वर्षाचा फिफटी फिफटीचा फार्मुला जवळपास निश्चित केला आहे. त्यामुळे अध्यक्ष भाजपाचा व उपाध्यक्ष राष्ट्रवादीकडे असे जवळपास निश्चित झाले आहे. असे असले तरी आज होणा-या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीत महायुतीची सत्ता स्थापन होणार की चमत्कार घडणार हे दुपारी १२ वाजेपर्यंत समजणार आहे.
२०१७ साली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती. या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला ५८ पैकी ३६ जागेवर यश मिळवत काँग्रेस पक्षाला सत्तेपासून दूर पाच वर्षे सत्तेचा अंमल केला. या निवडणूकीत कॉग्रेसला १५ जागेवर, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ५ जागेवर, शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. विरोधी पक्ष नेता म्हणून काँग्रेसने पाच वर्षे सत्ताधा-यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने अंकूश ठेवण्याचे काम केले. मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने गेल्या चार वर्षापासून लातूर जिल्हा परिषदेवर प्रशासक राज सुरू आहे. गेल्यावर्षी लातूर जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेत गेल्यावर्षी जि. प. ची सदस्य संख्या ५८ वरून ५९ झाली आहे. या ५९ जागेसाठी नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणूकीत भाजपाला केवळ १८ जागेवर समाधान मानावे लागले.
२०१७ च्या तुलनेत निम्याने संख्याबळ घसरलेल्या भाजपाला महायुती धर्म आठवला आणि मनधरणीच्या हालचाली सुरू झाल्या. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्या बळ ५ वरून निम्यापेक्षा जास्त १२ पर्यंत वाढले. तर काँग्रेस पक्षाचेही संख्याबळ १५ वरून २३ वर पोहचले. तसेच शदर पवार राष्ट्रवादी गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उध्दव ठाकरे शिवसेना गट यांच्या प्रत्येकी १ जागा व अपक्षांच्या दोन जागा निवडूण आल्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेचे गणित
बिघडले.
जिल्हा परिषदेच्या जागेसाठीचा निकाल भाजपा सोडला तर सर्वच पक्षांना उभारी देणारा आहे. अनेक मार्ग अवलंबू मात्र सत्तेत राहू या निती प्रमाणे भाजपाने निवडणूकीत महायुतीचे कार्ड सोईनुसार वापरले. तर सत्ता स्थापनेसाठी भाजप महायुतीचे कार्ड पुढे करत आज सत्ता स्थापनेचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने करणार आहेत. त्यामुळे भाजप आडीच वर्षे अध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष पदाचा कारभार करण्याचे संकेत मिळत असून विषय समित्याही दोन्ही पक्षाला विभागून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR