जीआरवरून ओबीसींमध्ये मतभेद

मुंबई : प्रतिनिधी
आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाज आमनेसामने आले आहेत. त्यातच मनोज जरांगे पाटील यांना उपसमितीने शासकीय आदेश दिल्यानंतर ओबीसी समाजाच्या आरक्षणावर घाला आल्याचा आरोप केला जात आहे. राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी बैठका, रॅलींचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज (८ सप्टेंबर) ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे, या बैठकीला सर्व ओबीसी नेत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस आमदार आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. मात्र, या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे चित्र आहे.

ओबीसी नेत्यांची आज (८ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. विजय वडेट्टीवार यांनी हे बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी त्यांनी शनिवारी (६ सप्टेंबर) नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र, नागपूर आणि आता मुंबईतील बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे अनुपस्थित राहणार आहेत. या संदर्भात तायवडे यांच्याशी संपर्क साधला असता, मुंबईतील बैठकीचे आमंत्रण नसल्याचे सांगतले. तसेच मनोज जरांगे यांना दिलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाचे कुठलेही नुकसान होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे यांनी मुंबईत आझाद मैदानात ५ दिवस बेमुदत उपोषण केल्यानंतर २ सप्टेंबर रोजी सरकारने त्यांची मागणी मान्य करत शासन आदेश दिले.

या जीआरमुळे ओबीसी आरक्षणावर घाला आल्याचा दावा छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके आदी ओबीसी नेते करत आहे. छगन भुजबळ यांनी तर न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याचा हा प्रकार असल्याची आरोप होत आहे. या बैठकीत सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाजावर कसा अन्याय झाला आहे, याची माहिती दिली जाणार आहे.

मात्र, जरांगे पाटील यांना सरकारने दिलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाचे कुठलेही नुकसान होत नाही, असा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी केला आहे. शिवाय सरकारने आमच्या १४ पैकी १२ मागण्या मान्य केल्या असून त्याच्या जीआर संदर्भात उद्या (९ सप्टेंबर) मुंबईत मंत्री अतुल सावे यांच्यासोबत बैठक असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46
Video thumbnail
BIG BREAKING! राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश घोषित | बाबासाहेब पाटलांची मोठी घोषणा
04:00
Video thumbnail
Purna|पूर्णा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक!
01:08
Video thumbnail
Latur|जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा! काँग्रेसचा एल्गार; २४ सप्टेंबरला बैलगाडीसह मोर्चा
00:54
Video thumbnail
Latur|जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; निटूरमध्ये टायर पेटले, महामार्ग ठप्प!
01:17
Video thumbnail
Latur Maratha Protest|मागण्या मान्य करा,नाहीतर मुंबई गाठू! लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा
01:19
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31

Latest news