जीआर मधून मराठा,ओबीसींची फसवणूक

नागपूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप आधीच सुटायला हवा होता, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाजामध्ये भांडण लावायची सवय आहे त्यामुळे आरक्षणासंबंधी निर्णय घेण्यास उशीर झाला. आरक्षणासंदर्भात ओबीसी समाजाचेही अधिकार अबाधित ठेवायचे आहेत आणि मराठा समाजाचे अधिकार आरक्षण देता आला पाहिजे. या आंदोलनातून स्पष्टता अजून बाकी असून २ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासंबंधी जो जीआर सरकारने काढला त्यामुळे मराठा-ओबीसी समाजाची फसवणूक झाली असल्याची अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे.

मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी पाच दिवसांचे उपोषण केले. यानंतर जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी विजय झाला असल्याचे म्हणत गुलाल उधळला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी नागपूरमध्ये संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुळात हा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा राजकीय कमी किंवा हा सोशल इकॉनॉमिकल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. वेगळा देश जो निर्माण झाला त्या अनुषंगाने शोधण्याची आवश्यकता आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा परंपरा लाभली आहे, मात्र गेल्या काही काळात मोदी सरकार आल्यावर जे धोरण देशात राबवली जात आहेत या परिस्थितीने शासन केला आहे त्यामुळे उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली आहे, असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जरांगे पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उचलला त्यांनी तळागाळातील मराठा समाजातील अपेक्षा अधोरेखित करीत असताना या मोहिमेचा नेतृत्व केले. मागच्यावेळी नवी मुंबईच्या वेशीवरून गुलाल उधळून आंदोलकांना वापस पाठवले आणि आरक्षण मिळाले अशी आवई ठोकल्या गेली आणि मराठा समाजाचे फसवणूक झाली, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. निवडणुका लागल्या त्यावेळी सात दिवसाच्या आत आरक्षण देऊन असं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते.

ओबीसींच्या आरक्षणात वाढ आवश्यक
मराठा आणि ओबीसी या दोघांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता कालच्या निर्णयाच्या माध्यमातून असू शकते त्यामुळे स्पष्टता आणणे फार आवश्यक आहे. या एकूण सर्व शासन निर्णयाच्या जी चर्चा ऐकतो त्याचा योग्य स्वरूपात निघू द्या आमची जी भूमिका आहे ती मराठ्यांना आरक्षण देण्याची आहे मात्र ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे या आरक्षणातही वाढ झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30

Latest news