नांदेड : भाग्यनगर पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाउन अंतर्गत मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर धाड टाकून ४ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाग्यनगर ठाण्याच्या पोलिस पथकाला मिळालेल्या माहितीनूसार अरूणोदय नगर परिसरात एका जुगार अड्डयावर धाड टाकण्यात आली. यावेळी ९ आरोपींना ताब्यात घेण्यात घेऊन रोख २२,५०० रुपये, जुगार साहित्य, ६ मोटारसायकली व ७ मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाई पकडण्यात आलेल्या जुगा-यांची नावे गौतम दौलत जोंधळे (२५) अजिजखान इस्माईल खान पठाण (३५) राहुल गणपत मोरे (२३) सागर उत्तमराव सूर्यवंशी (३०) लक्ष्मण उत्तमराव चिंचोके (३५) स्वप्नील प्रकाश गजभारे (३२) अतुल भाऊराव कवडे (३२) विठ्ठल गोविंद धोत्रे (३८) नंदकिशोर प्रल्हाद कदम (३०) अशी आहेत.
















