26.3 C
Latur
Wednesday, March 26, 2025
Homeमहाराष्ट्रजेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट

जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट

राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण ‘मल्हार’ नावाला विरोधच 

मुंबई : मटण विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळातच या नावावरुन दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. विश्वस्त मंडळांपैकी 5 जणांनी मल्हार नावाल नावाला पाठिंबा दिलाय. मात्र, दोन विश्वस्तांसह जेजुरीतील नागरिकांनी या नावाला विरोध दर्शवला आहे. हिंदू समाजाद्वारे मांस मटण विक्रीसंदर्भात मल्हार सर्टिफिकेट योजना सुरू करण्यात येत आहे.

दरम्यान, मल्हार सर्टिफिकेटचा वाद आता मुख्यमंर्त्यांकडे जाणार असून जेजुरी देवस्थानच्या ट्रस्टींनी मल्हार सर्टिफिकेशनमध्ये मल्हार नावाला विरोध केला आहे. येथील ग्रामस्थ, सेवेकरी, पुजारी, मानकरी आणि माजी विश्वस्तांचाही या नावाला विरोध असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. आमचा सर्टिफिकेशनला विरोध नाही, पण मल्हार नाव वापरू नका अशी भूमिका आहे.

ग्रामस्थ, पुजारी, खांदेकरी सेवेकरी आणि माजी विश्वस्त यांनी या नावाला विरोध असल्याचं म्हटलं आहे. मार्तंड देवस्थानने भाविकांना सोयी सुविधा देण्याचं काम करावं, या देवाच्या बाबतीत मार्तंड देवस्थानने हस्तक्षेप करू नये अशी देखील गावक-यांची मागणी आहे. त्यामुळे, मल्हार नावाच्या सर्टिफीकेटसंदर्भातील भूमिकेचा वाद अद्यापही कायम आहे. दरम्यान, आता झटका मटण सर्टिफिकेटसाठी ‘मल्हार’ नावाचं सर्टिफिकेट देऊ नका, अशी मागणी करत मंत्री नितेश राणे यांना जेजुरी खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांनी विधानभवनात भेटून निवेदन दिले. श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांनी आज मंत्री नितेश राणे यांची आम्ही भेट घेत त्यांचा सत्कार व सन्मान केला. मात्र, ‘मल्हार’ हे नाव मटणच्या सर्टिफिकेट ला देऊ नये अशी मागणी केली आहे.

खंडोबा देवता ही मांसाहारी नाही, त्यामुळे, या नावामुळे उगाच गैरसमज पसरत आहेत. मल्हार नाव असू द्या किंवा कुठल्याही हिंदू देवतांचे नावं असू द्या अशी नावं ही मटण सर्टिफिकेटसाठी देऊ नये ही आमची मागणी निवेदनाद्वारे आम्ही त्यांना दिल्याचे खडेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांनी सुद्धा ही मागणी सकारात्मकतेने घेतली असून मुख्यमंर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे म्हटलं आहे. दुसरीकडे श्री मार्तंड देवस्थान विश्वस्तामधील 5 जणांनी या मल्हार नावाला आपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे, देवस्थान विश्वस्तांमध्येच दोन गट पडल्याचे दिसून येते.
मल्हार नावाचा वाद मुख्यमंत्र्यांकडे या अगोदर सुद्धा कुठल्याही देवदेवतांची नाव किंवा महापुरुषांची नावे ही मांसाहारी हॉटेल किंवा बियर बार याला देऊ नका असा निर्णय झाला होता. मल्हार सर्टिफिकेटचा वाद आता मुख्यमंर्त्यांकडे जाणार असून जेजुरी देवस्थानच्या ट्रस्टींनी मल्हार सर्टिफिकेशनमध्ये मल्हार नावाला विरोध केला आहे. येथील ग्रामस्थ, सेवेकरी, पुजारी, मानकरी आणि माजी विश्वस्तांचाही या नावाला विरोध असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. आमचा सर्टिफिकेशनला विरोध नाही, पण मल्हार नाव वापरू नका अशी भूमिका आहे. दरम्यान, श्री मार्तंड देवस्थानच्या सात विश्वस्तांपैकी दोन विश्वस्तांनी विरोध केला असून पाच विश्वस्तांनी पाठिंबा दिला आहे.

५ विश्वस्तांचा ‘मल्हार’ नावाला पाठिंबा
श्री मल्हार म्हणजेच श्री खंडेराया हे सबंध देश व महाराष्ट्रातील अखंड हिंदू समाजाचे कुलदैवत आहे. प्रत्येक मल्हार भक्त हा आपल्या कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कुलदैवतेच्या साक्षीने व त्यांचे स्मरण करूनच करतो. प्रसार माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्यांमधून असे निदर्शनास आले की, हिंदू समाजाद्वारे मांस मटण विक्रीसंदर्भात मल्हार सर्टिफिकेट योजना सुरू करण्यात येत आहे. यासबंधी श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्या माननीय विश्वस्त मंडळामध्ये साधक-बाधक चर्चा झाली व या निर्णयासंबंधी सर्व बाजूनी विचार करून माननीय विश्वस्त मंडळाने बहुमताने असा निर्णय घेतला की, या योजनेला मल्हार हे नाव देण्यास आपत्ती आक्षेप असण्याचे कोणतेही कारण नाही, याउलट या निर्णयाचे आम्ही स्वागतच करत आहोत, असे पत्रकच विश्वस्त मंडळाने जारी केलं आहे. त्यामध्ये, 5 विश्वस्तांनी सह्या करुन भूमिका मांडली आहे. अभिजीत देवकते यांच्या नेतृत्वात प्रमुख विश्वस्त म्हणून हे पत्रक जारी करण्यात आलंय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR