व्हेनिस (इटली) : वृत्तसंस्था
अब्जाधीश उद्योगपती जेफ बेझोस आणि त्यांची सखी लॉरेन सांचेज यांच्या भव्य विवाह सोहळ्यावरून ऐतिहासिक शहर व्हेनिसमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात प्रचंड खर्चाच्या या विवाह सोहळ्याला विरोध करत नागरिक रस्त्यावर उतरले असून, ठङ्म रस्रंूी ऋङ्म१ इी९ङ्म२ असा मोठा फलक शहरातील सुप्रसिद्ध बेल टॉवरवर झळकवण्यात आला आहे.
बेझोस-सांचेज यांचा लग्नसोहळा १० मिलियन डॉलर्स (सुमारे ८३ कोटी रुपये) खर्चाचा असून, विविध ठिकाणी विविध कार्यक्रम होतील, यामध्ये सॅन जॉर्जिओ मॅजिओरे बेट याचा समावेश आहे. नागरिक यासाठी निषेध करताहेत की, व्हेनिसमध्ये आधीच अतिपर्यटनामुळे स्थानिक सामान्य जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे.
व्हेनिस केवळ पोस्टकार्डवर छापले गेलेले विवाहस्थळ म्हणून नाही, तर बहुश्रुत श्रीमंतांपुढे न झुकणारे शहर म्हणून ओळखले गेले पाहिजे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. म्हणूनच विवाहसोहळा उधळून लावण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. आंदोलनकर्ते लग्नाच्या वेळी कालवे आणि रस्ते अडवण्याची योजना करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, असे भव्य कार्यक्रम तात्पुरते रोजगार निर्माण करतात, पण शहरासाठी फार काही टिकवून ठेवत नाहीत. तसेच, बेझोस यांची ५०० मिलियन डॉलर्सची ‘कोरु’ सुपरयॉट हे देखील संतापाचे कारण बनले आहे.