26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeमहाराष्ट्रजैन बोर्डिंगचा व्यवहार अखेर रद्द

जैन बोर्डिंगचा व्यवहार अखेर रद्द

बिल्डर विशाल गोखले यांचा निर्णय, धंगेकर झाले होते आक्रमक
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टबरोबर केलेला व्यवहार रद्द करण्याचा निर्णय बिल्डर विशाल गोखले यांनी घेतला आहे. जैन बोर्डिंगच्या जागेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून तापला होता. शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनीही हा विषय लावून धरला होता. रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग व्यवहारावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले होते.

जैन बोर्डिंग ट्रस्टबरोबरचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय विशाल गोखले यांनी घेतला. या जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय गोखले यांनी ई-मेलवरून ट्रस्टला कळवला. या व्यवहारातून बाहेर पडण्याचा गोखले यांनी निर्णय घेतला. नैतिकतेच्या मुद्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे गोखले यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे. याशिवाय जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, असेही गोखले म्हणाले.

राजू शेट्टी यांच्या आज संध्याकाळी केलेल्या आवाहनानंतर गोखले यांच्याकडून जैन बोर्डिंग ट्रस्टसोबत झालेला व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यवहार रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती राजू शेट्टी यांना कळवली. दरम्यान, गोखले बिल्डर जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यासंदर्भात अर्ज देण्याची शक्यता आहे.

शेट्टींच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दुपारी ८६ हून अधिक जैन संस्था, संघटनांची बैठक घेतली. या बैठकीत जैन बोर्डिंग विकण्याचा ट्रस्टींनी घेतलेला निर्णय बेकायदेशीर आहे. हा व्यवहार ट्रस्टींनी रद्द करावा आणि खरेदी व्यवहार करणा-या गोखले बिल्डर यांना विनंती करण्याचा ठराव झाला. त्यानंतर गोखले बिल्डरने व्यवहार रद्द केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR