Homeमहाराष्ट्रज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक डॉ. जयसिंगराव पवार कालवश

ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक डॉ. जयसिंगराव पवार कालवश

कोल्हापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज निधन झाले. आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८५ वर्षाचे होते. आज सकाळी ९.१५ वाजता कोल्हापूरातील साने गुरुजी वसाहत येथील त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघेल अशी माहिती आहे.

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यांच्यावर कोल्हापूरातील आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठेशाहीचा इतिहासकार हरपला अशी भावना व्यक्त होत आहेत.

इतिहास घडवणा-यांच्या पुढच्या पिढ्यांनी इतिहास लिहिला नाही असे म्हणतात. डॉ.जयसिंगराव पवार या व्यक्तिमत्वाने कोल्हापूरच्या मातीत राहून आपल्या लेखणीतून याला छेद देऊन अनेक संदर्भासह माहिती पुढे आणली. इतिहास उलगडणार एक विद्यापीठ कायमचे हरपले, अशा भावना व्यक्त होत आहेत.

डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. महाविद्यालयातील एम.ए.पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २० क्रमिक पुस्तके लिहिली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला १९६४ मध्ये सुरुवात झाली. या काळात त्यांनी विद्यापीठातील इतिहास विभागात ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केला.

असा असेल अंत्ययात्रेचा मार्ग
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे निवासस्थान असलेल्या साने गुरुजी वसाहत येथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल.शिवतेज बंगला, जुना वाशी नाका, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, खासबाग, बिंदू चौक पद्मा टॉकीज, दसरा चौक, राजर्षी शाहू महाराज स्मृतीस्थळ, जुना बुधवार पेठ तोरस्कर चौक ते पंचगंगा स्मशानभूमी या मार्गाने अंत्ययात्रा निघणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR