28.2 C
Latur
Tuesday, January 13, 2026
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी आणि कामगार नेते बाबा आढाव यांचे सोमवार दि. ८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी निधन झाले, ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजार होते, त्यांतच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच, शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. तर, गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले होते.

तेव्हाही शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पन्नालाल सुराणा यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना आदरांजली वाहिली होती. बाबा आढाव यांना गेल्या १० ते १२ दिवसांपासून पुना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू होते. उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले होते. अखेर, आज रात्री ८.२५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कष्टक-यांसाठी लढणारा, समाजवादी विचारांचा नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR