लातूर : प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, आदर्श शिक्षक जीवनधर सखाहरी शहरकर यांचे दि. १३ मे रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनूसार सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्यात आले. तत्पुर्वी त्यांचे नेत्रदानही करण्यात आले.
येथील अंबाजोगाई रोडवरील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. स्वातंत्र्य सैनिक जीवनधर शहरकर यांनी जवळपास सर्वच वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून काम पाहिले. त्यांनी लातूरच्या मारवाडी राजस्थान विद्यालयात शिक्षक म्हणून ज्ञानदानचे कार्य केले. महात्मा गांधी विचाराने भारावलेले जीवनधर शहरकर गुरुजी आदर्श शिक्षक होते.