रोम : वृत्तसंस्था
इटलीतील २,००,००० वर्षे जुन्या जगप्रसिद्ध माउंट स्ट्रॉम्बोली ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला. यावेळी पर्यटकांनी जीव वाचविण्यासाठी बोटीतून पळ काढला.
काही पर्यटक समुद्रात असलेल्या छोट्या बेटाजवळ गेले होते. परत येताना अचानक ज्वालामुखीचा उद्रेक झाला. बोटीवरच्या व्यक्तीने त्या क्षणाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओमध्ये दिसते की, ज्वालामुखी फुटताच समुद्रात प्रचंड लाटा उठल्या. ज्वालामुखीतून उसळलेल्या राखेने तर संपूर्ण आकाश व्यापले. दृश्य इतके भयानक होते की, अनेकांना ते ‘अणूबॉम्बचा स्फोट’ वाटला. यादरम्यान, बोटीचालक जीव वाचवण्यासाठी बोट वेगाने पळवत होते.
सर्वात सक्रिय ज्वालामुखी
माउंट स्ट्रॉम्बोली हा जगातील सर्वात जुना व सक्रिय ज्वालामुखी मानला जातो. वैज्ञानिकांच्या मते हा सुमारे २ लाख वर्षांपूर्वी तयार झालेला आहे. दरवर्षी येथे लहान-मोठे उद्रेक होतात.
















