इंडोनेशियातील माउंट ब्रोमो डोंगरावरील ज्वालामुखीच्या टोकावर गणेशाचं मंदिर आहे. माउंट ब्रोमोचा अर्थ स्थानिक भाषेत ब्रम्हा असा होतो. पण हे मंदिर गणेशाचे आहे. स्थानिकांचे असे मत आहे की, येथील मूर्ति ७०० वर्षांपासून तिथेच आहे. जी त्यांच्या पूर्वजांनी स्थापित केली. मान्यतांनुसार, हीच गणेशाची मूर्ती ज्वालामुखीच्या इतक्या जवळ असूनही त्यांचे रक्षण करत आली आहे. माउंट ब्रोमोच्या आजूबाजूला जवळपास ३० गावं आहेत आणि यात या समाजाचे जवळपास १ लाख लोक राहतात. हे लोक स्वत:ला हिंदू मानतात आणि ते हिंदू संस्कृतीचे आचरण करतात. पण काळानुसार त्यांच्या रितीरिवाजात बौद्ध रिवाजही जुळले गेले आहेत. जसे की, ते गणेश, ब्रम्हा आणि विष्णूसोबत बुद्धाचीही पूजा करतात.

