22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeक्रीडाटीम इंडियाचा दणदणीत विजय

टीम इंडियाचा दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेला धक्का, भारताची २-१ ने आघाडी
धर्मशाला : वृत्तसंस्था
भारताने तिस-या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करीत दणदणीत विजय मिळविला. भारताच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ११७ धावांत रोखले. अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी दमदार गोलंदाजी केली. एडन मारक्रम याने ६१ धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. तिस-या टी-२० मधील विजयासह भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ विकेटने पराभूत केले.

अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलने अर्धशतकी भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या ६० धावा झाल्या असताना अभिषेक शर्मा ३५ धावांवर बाद झाला. पहिल्या २ सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरलेल्या शुभमन गिलला या मॅचमध्ये फॉर्म गवसला. शुभमन गिलने २८ धावा करून बाद झाला. कॅप्टन सूर्यकमार यादव १२ धावा करून बाद झाला. तिलक वर्माने २६ धावा केल्या तर शिवम दुबेने १० धावा केल्या.

भारताच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी
अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी एक-एक विकेट घेतली. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ २० ओव्हरमध्ये ११७ धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मारक्रम याने ६१ धावांची खेळी केली. कॅप्टन एडन मारक्रम खेळपट्टीवर एक बाजू लढवत होता. मात्र, दुस-या बाजूला दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज बाद होत राहिले. दक्षिण आफ्रिकेच्या बहुतांश खेळाडूंना दोन आकडी धावसंख्याही करता आली नाही.

अर्शदीप सिंगचे कमबॅक
अर्शदीप सिंगने दुस-या टी-२० मॅचमध्ये ४ ओव्हरमध्ये ५४ धावा दिल्या होत्या. अर्शदीपने तिस-या टी-२० मॅचमध्ये कमबॅक करत ४ ओव्हरमध्ये २ विकेट घेत १३ धावा दिल्या. अर्शदीप सिंगने दुस-या टी-२० मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये ७ वाईड बॉल टाकल्याने त्याच्यावर टीका झाली होती. मात्र, त्या अपयशातून सावरत अर्शदीपने याने टी-२० क्रिकेटमधील भारताचा आघाडीचा आणि महत्त्वाचा गोलंदाज असल्याचे दाखवून दिले.

भारताची मालिकेत आघाडी
भारताने धर्मशाला येथील तिस-या टी-२० मॅचमध्ये विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता चौथी टी-२० मॅच १७ डिसेंबरला लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर होईल तर पाचवी टी-२० मॅच नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे १९ डिसेंबरला होणार आहे. पुढील सामन्यात विजय मिळवत आणखी एक मालिका जिंकण्याची संधी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाकडे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR