लातूर : प्रतिनिधी
पुणे येथील स्पेशल फोर्टी फेसबुक ग्रुप व ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिशनच्या वतीने आयोजित भक्ती बर्वे-इनामदार करंडक स्पर्धेत लातूरच्या जयक्रांती अध्यापक महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या, मनोज कोल्हटकर यांनी लिहिलेल्या व अॅड. शैलेश गोजमगुंडे दिग्दर्शित ‘टू इज कंपनी’ या नाटकाची पुणे येथे होणा-या अंतिम फेरीत निवड झाली आहे.
संबंध महाराष्ट्रातून ३३ संघ सहभागी झालेल्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी शूटिंग (रेकॉर्डिंग) लेवलवर पार पडली. यात अंतिम फेरीसाठी ९ संघांची निवड झाली. या नाटकामध्ये राजीव गड्डीमे, अॅड. हंसराज (सुनील) साळुंके व बालाजी कांबळे या गुणी अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर प्रकाश योजना गुणवंत (सुरेश) सूर्यवंशी, संगीत संयोजन अक्षय बाहेती, नेपथ्य अॅड. बालाजी म्हेत्रे तर रंगभूषा सचिन उपाध्ये यांनी केले आहे. जस्ट फॉर फन, उंच माझा झोका गं !, मुक्ती, उन्हातलं चांदणं या नाटकांनंतर आता टू इज कंपनी या नाटकाने महाराष्ट्र पातळीवर लातूरच्या नाट्यविश्वाला सन्मान मिळवून दिला आहे. आता प्रतीक्षा अंतिम फेरीची आहे. या नाटकासाठी निर्मिती सहाय्य प्रा. प्रशांत घार, योगीराज पुणेकर यांचे आहे तर सुधीर गोजमगुंडे, अजय गोजमगुंडे, कामगार कल्याण विभागाचे सलीम पठाण यांचे विशेष सहाय्य लाभले आहे.
या निर्भेळ यशासाठी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. गिरीश सहदेव, प्रा. दीपक वेदपाठक, डॉ. अशोक आरदवाड, रणजित आचार्य, अनील पुरी, बंडू येचवाड, लक्ष्मण वासमोडे, अविष्कार गोजमगुंडे, दस्तगीर शेख, निलेश सराफ, बाळकृष्ण धायगुडे, अनिल कांबळे, सुमती बिडवे, शंकर चामे, नामदेव मुसने, भारत थोरात, प्रमोद कांबळे, संजय जमदाडे, महेश दास्ताने, मंजुषा पाठक, सुधीर राजहंस, संजय प्रभाकर अयाचित, शरद कुलकर्णी, राजकुमार राउत, शिरीष पोफळे, संजय अयाचित, ज्योतिबा बडे, शिवहर आकुसकर, रवी सावंत, नवलाजी जाधव, उदय गोजमगुंडे, सुधीर बिरले, अरुण बारसकर, अजय कातपुरे, दयानंद सरपाळे, वाय. डी. कुलकर्णी, किशोर जोशी, अंजली देशमुख आदींनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
















