नंदुरबार : प्रतिनिधी
नंदुरबारमध्ये भीषण अपघात झाला आहे. नंदुरबारहून शहादाच्या दिशेने जाणा-या प्रवासी टॅक्सी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत ५ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत गाडीचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. १० जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास शहादा तालुक्यातील लांबोळा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. नंदुरबारहून शहादाच्या दिशेने एक प्रवासी टॅक्सी जात होती. त्याच सुमारास मालवाहू ट्रकसुद्धा त्याच मार्गावरून जात होता. यादरम्यान दोघांची जोरदार धडक झाल्याने दुर्दैवी अपघात झाला.
हा अपघात इतका भीषण होता की टॅक्सी आणि ट्रकचा चक्काचूर झाला. शिवाय या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून २ जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

