मुंबई : वृत्तसंस्था
जुलै २०२५ मध्ये फोर्ब्सने भारतातील टॉप १० श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली असून या यादीत एक नवा चेहरा देखील सामील झाला आहे. यावेळी भारतात एकूण २०५ अब्जाधिश आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती जुलै २०२५ मध्ये सुमारे $११६ अब्ज इतकी आहे. फोर्ब्सच्या ग्लोबल यादीत ते १५व्या स्थानावर असून $१०० अब्ज क्लबमध्ये सामील होणारे ते एकमेव आशियाई आहेत.
दुस-या क्रमांकावर आहेत गौतम अदानी, २०२३ मध्ये हिंडनबर्ग रिसर्च या शॉर्ट सेलर फर्मने त्यांच्यावर आर्थिक हेराफेरीचे आरोप लावले होते. ज्यानंतर त्यांचे मार्केट व्हॅल्यू $१२० अब्जने कमी झाले होते. तिस-या क्रमांकावर आहेत एचसीएलचे संस्थापक शिव नाडर, यांची एकूण संपत्ती $३८ अब्ज आहे.
या यादीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चौथ्या स्थानावर असलेल्या एकमेव महिला अब्जाधिश सावित्री जिंदल आणि त्यांचा परिवार. त्यांच्या एकूण संपत्तीची किंमत आहे $३७.३ अब्ज. पाचव्या स्थानावर आहेत सन फार्माचे संस्थापक दिलीप शांघवी $२६.४ अब्ज, तर सहाव्या क्रमांकावर आहेत सायरस पुनावाला, यांची संपत्ती $२५.१ अब्ज आहे. कुमार मंगलम बिर्ला ($२२.२ अब्ज) हे सातव्या, लक्ष्मी मित्तल ($१८.७ अब्ज) आठव्या, ‘डीमार्ट’चे राधाकृष्ण दमानी ($१८.३ अब्ज) नवव्या आणि शेवटी या यादीत नव्याने प्रवेश करणारे ‘डीएलएफ’चे कुशलपाल सिंह दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती $१८.१ अब्ज आहे. ते माजी सैनिक असून त्यांनी आपल्या सास-याच्या रिअल इस्टेट कंपनीचे नेतृत्व १९६१ पासून पाच दशकांहून अधिक काळ केले.
जगातील टॉप १० श्रीमंत (८ जुलै २०२५ पर्यंत)
एलन मस्क ($३९३.१) अब्ज, लैरी एलिसन ($२७५.९ अब्ज), मार्क झुकरबर्ग ($२४७.९ अब्ज), जेफ बेजोस ($236.8 अब्ज), बर्नार्ड अर्नॉल्ट व कुटुंब ($१४७.७ अब्ज), लैरी पेज ($१४६.२ अब्ज), वॉरेन बफेट ($१४३.१ अब्ज), स्टीव्ह बॉलमर($१४१.३ अब्ज), सर्गे ब्रिन ($१३९.७ अब्ज), जेनसन हुआंग ($१३७.९ अब्ज).

