24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeराष्ट्रीयट्रकची कारला धडक, ६ ठार

ट्रकची कारला धडक, ६ ठार

बूंदी : वृत्तसंस्था
राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यातील हिंडोली पोलिस स्टेशनजवळ एक भयंकर अपघात घडला आहे. येथील तालाब गावाजवळ रविवारी एका ट्रकची कारला जबरदस्त धडक बसून सहा लोकांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलिस अधीक्षक, हिंडोली पोलिस उपाध्यक्षांसह मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी पोहोचले. सर्व मृतांना गाडीतून बाहेर काढत जिल्हा रुग्णालयातील शवागृहात पाठवण्यात आले आहे. तर जखमींना कोटा येथे पाठविण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश येथील नऊ जण एका कारने खाटूश्याम यांच्या दर्शनासाठी जात होते. दरम्यान बूंदी बोगद्यापासून अर्धा कि.मी. दूर गेल्यावर समोरून येणा-या ट्रकने कारला जबरदस्त धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सेन्सर कर्मचारी आणि हिंदोली पोलिसांच्या मदतीने सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढता आले. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR