26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeअंतरराष्ट्रीयट्रम्प टॅरिफ : अमेरिकी अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार!

ट्रम्प टॅरिफ : अमेरिकी अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार!

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लावलेल्या नव्या टॅरिफमुळे अमेरिकन कुटुंबाला दरवर्षी सरासरी सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते, असा इशारा येल विद्यापीठातील द बजेट लॅब या संस्थेचे अर्थशास्त्र विभागाचे संचालक एर्नी टेडेस्ची यांनी आपल्या ‘स्टेट ऑफ यूएस टॅरिफ्स : ३० जुलै २०२५’ या अहवालात दिला आहे.

जेपी मॉर्गनच्या अहवालातही ‘द बजेट लॅब’च्या अहवालातील निष्कर्षांना दुजोरा देण्यात आला आहे. टॅरिफमुळे ग्राहकांना अधिक पैसा खर्च करावा लागणार असून यामुळे देशाची आर्थिक वाढ मंदावत असल्याचे जेपी मॉर्गनने म्हटले आहे. टॅरिफमुळे २०२५ मध्ये १६,७७० कोटी रुपयांचा महसूल मिळेल, पण, कुटुंबांवर पडणारा भार अधिक असणार आहे.

वाढती व्यापार तूट : टॅरिफद्वारे व्यापार तूट कमी करण्याचे ट्रम्प यांचे उद्दिष्ट होते, मात्र यामुळे ती अधिकच वाढली आहे.

काँग्रेस बजेट ऑफिसची चिंता : अध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था तिच्या पूर्ण क्षमतेइतकी वाढू शकणार नाही, अशी चिंता अमेरिकेच्या काँग्रेस बजेट ऑफिसने देखील व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR