23.1 C
Latur
Friday, October 11, 2024
Homeलातूरट्वेंटीवन शुगरच्या रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

ट्वेंटीवन शुगरच्या रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या मुलांच्या हातांना काम मिळवून देऊन ही कुटुंबे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, मांजरा परिवारातील साखर कारखाने व बँकांनी पुढाकार घ्यावा, असा सूचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून १२ सप्टेंबर रोजी ट्वेंटीवन शुगर युनिट-१ च्या   वतीने आयोजित रोजगार मेळाव्यास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 या तरुणांना प्रशिक्षणासह, आर्थिक व इतर सर्व प्रकारची मदत करुन उद्योजक व व्यावसायिक बनवण्याचा प्रयत्न होणार आहे. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने सध्या ग्रामीण भागात सुशिक्षित तरुणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, या तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी त्यांना शेतीपूरक उद्योग, व्यवसायात मदत करण्याचा निर्धार मांजरा परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे.  माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरुन १२ सप्टेंबर  रोजी ट्वेंटीवन शुगर युनिट-१ च्या वतीने, कारखाना साईट   मळवटी येथे, या तरुणांसाठी रोजगार मेळावा घेण्यात आला, मिळाल्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हजारोच्या संख्येने या ठिकाणी युवकांनी आपली नोंदणी केली.
विविध प्रकारची वाहन चालवणेचे प्रशिक्षण घेतलेले युवक, ऊस तोडणी यंत्रावर काम करण्याची तयारी असलेली युवक, वाहन व इतर  मशिनरीची दुरुस्ती करण्याची तयारी असलेल्या युवकांची नोंदणी करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे हमी या ठिकाणी देण्यात आली, शेतीसाठी लागणारी इतर  अवजारे खरेदी करून त्याचा  व्यवसाय करणा-यांसाठीही, ट्वेंटीवन शुगर व बँकांच्या वतीने  हमी  देण्याची तयारी यावेळी दर्शवण्यात आली, त्यामुळे या हा रोजगार मेळावा, अनेक तरुणांच्या हाताला तातडीने काम देणारा तर ठरलाच शिवाय अनेक तरुणांना उद्योजक आणि व्यावसायिक बनणारा  ठरला आहे.
ट्वेंटीवन शुगर युनिट क्रमांक १, मळवटीच्या वतीने आयोजित या रोजगार मेळाव्यास लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विलास को-ऑपरेटिव बँक तसेच आयसीआयसीआय, एचडीएफसी, सुंदरम, महिंद्रा, एचडीबी, चोलामंडलम, एयुइंडसन, एलअँडटी, व इतर खाजगी फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी, महिंद्रा, स्वराज, हिंदुस्तान, मॅसी, फरगुशन, जॉन डियर, कुबोटा इत्यादी वाहन कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्या वेगवेगळ्या वाहनांसह या मेळाव्यास उपस्थित होते.  शिवशक्ती, लक्ष्मण, श्रद्धा, नृस्ािंह, हिंदुस्तान, लक्ष्मी इत्यादी ट्रॉली व जाळी बनवणा-या  कंपन्यांचे प्रतिनिधी ही आपल्या उत्पादन वैशिष्ट्यसह येथे उपस्थित होते, ज्यांना नोकरी पाहिजे त्यांना नोकरी आणि ज्यांना उद्योग व्यवसायिक बनायचे आहे त्यांच्यासाठी कर्जाची  हमी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न  झाला त्यामुळे हा रोजगार  मिळावा अत्यंत यशस्वी ठरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR