ठाणे : प्रतिनिधी
उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील नारळ आणि शेण फेकीचे पडसाद आता कोल्हापुरात उमटले आहेत. शनिवारी रात्री कोल्हापुरातील संतप्त शिवसैनिकांनी शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण शाखा फलकांना काळे फासत तोडफोड केली आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाण्यात मेळाव्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी शेण, बांगड्या आणि नारळ फेकल्याची घटना घडली. या घटनेमुळे मुंबईसह राज्यातील शिवसैनिक संतप्त झाले असून आता मनसे विरुद्ध ठाकरे गट असा वाद निर्माण झाला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय या घटनेमुळे आता पुढच्या काळात कोल्हापूर शहरातील मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.