डिझेलच्या टंचाईमुळे शेती मशागतीची कामे ठप्प 

देवणी : बाळू तिपराळे
देवणी तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या डिझेल टंचाईची समस्या गंभीर बनली असून त्याचा थेट परिणाम शेतीच्या मशागतीच्या कामांवर झाला आहे. मान्सूनपूर्व नांगरणी, कुळवणी, पेरणीपूर्व मशागत आदी कामांसाठी शेतकरी युद्धपातळीवर तयारी करीत असताना डिझेलअभावी ट्रॅक्टर व कृषी यंत्रसामग्री ठप्प पडण्याची वेळ आली आहे.
ग्रामीण भागातील अनेक पेट्रोलपंपांवर प्रशासनाच्या नियमांमुळे कॅन किंवा बॅरलमध्ये डिझेल देण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने शेतक-यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुतांश शेतक-यांची शेती गावापासून लांब अंतरावर असल्याने वारंवार पेट्रोलपंपावर जाऊन डिझेल आणणे खर्चिक आणि वेळखाऊ ठरत आहे. त्यामुळे शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. सध्या शेती मशागतीचा हंगाम सुरू असून येत्या काही दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत वेळेत मशागत पूर्ण न झाल्यास पेरणी उशिरा होण्याची भीती शेतक-यांकडून व्यक्त केली जात आहे.
हवामानाचा अंदाज बदलत असल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय ट्रॅक्टर चालक, शेतमजूर आणि कृषी व्यवसायाशी संबंधित घटकांनाही या टंचाईचा फटका बसत आहे. शेतक-यांनी प्रशासनाकडे शेतीकामासाठी कॅनमध्ये डिझेल देण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. डिझेल पुरवठा सुरळीत न झाल्यास शेती उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, असा इशारा शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे.  तालुक्यातील विविध गावांमध्ये डिझेलचा पुरवठा नियमित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
इंधन दरवाढीमुळे शेतकरी त्रस्त
सध्याच्या महागाईच्या काळात शेतक-याला वाटत आपण पिकवलेल्या शेतमालास व्यवस्थित भाव भेटत नाही. बैलजोडी ठेवून शेती करणे अवघड जात आहे म्हणून वाहनधारकांकडून कमी दरात मेहनत व्हावी, अशी अपेक्षा शेतक-यांची आहे पण शासनाने डिझेल पेट्रोलचे भाव वाढवलेले आहेत त्यामुळे कमी दरात शेतीची मेहनत करून देणे परवडत नाही.
-नारायण सोलनकर, वाहनधारक

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23
Video thumbnail
येलदरी जलाशयात मासेमारी नाकारल्याने मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
03:22
Video thumbnail
Nanded|कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाही-आ.हेमंत पाटील
03:09
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका सुरूच; लातूरचे FDA प्रशासन अजूनही झोपेत?
02:05
Video thumbnail
Latur Traffic Police|जीवघेण्या पद्धतीने वाहन अडवणारा ट्रॅफिक पोलीस निलंबित...
02:28
Video thumbnail
Latur MIDC|22 तासांच्या झुंजीनंतर MIDC मधील भीषण आग आटोक्यात; 5 कोटींचे नुकसान
03:48
Video thumbnail
धावत्या बाईकस्वाराला पाडणे पडले महागात; लातूरमध्ये 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर ट्रॅफिक पोलीस निलंबित!
00:19
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13

Latest news